

rat८p७.jpg-
26O68546
रत्नागिरी : विजयालक्ष्मी श्रीकृष्ण गांधी कनिष्ठ महाविद्यालयात बोलताना जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी. डावीकडून वृंदाली गुरव, जानकी घाटविलकर, वर्षा जोशी, शुभांगी शिंदे आदी.
---
ध्येयापासून दूर जाऊ नका!
चंद्रकांत सूर्यवंशी ः निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : ‘‘आपण आपल्या ध्येयापासून लांब जाऊ नये. आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचे आहे त्यानुसार आपले वर्तन असावे,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
येथील कै. सौ. विजयालक्ष्मी (गोदूताई) श्रीकृष्ण (नाना) गांधी कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात श्रीकृष्ण (नाना) गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, पर्यवेक्षिका वर्षा जोशी, वृंदाली गुरव, शुभांगी शिंदे, मानसी चव्हाण, दीपिका कुळकर्णी, शलाका वर्तक, निष्ठा सावंत, शीतल रोकडे, मालन तांबोळी, कल्पना नागवेकर तानाजी वाघमारे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना शशांक गांधी यांच्याकडून रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली. कला शाखेतून प्रथम स्नेहल खापणे, द्वितीय शमिका चव्हाण, तृतीय साथिया संते, उत्तेजनार्थ वैष्णवी कक्केरकर, सानिका वारीशे, वाणिज्य शाखेतून प्रथम सानिया मालप, द्वितीय अलिशा फर्नांडिस, तृतीय अनुष्का मडके, उत्तेजनार्थ यश विलणकर, जयश्री गवंड यांनी यश मिळवले. तर विज्ञान शाखेतून प्रथम गायत्री किनरे, द्वितीय ईशानी जोशी, तृतीय सुजल नेवरेकर, उत्तेजनार्थ वैष्णवी चौघुले, तनिष्का घवाळी यांना गौरवण्यात आले. परीक्षणाचे काम मानसी चव्हाण, वृंदाली गुरव, शुभांगी शिंदे यांनी केले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.