बाळाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बाळाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बाळाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

sakal_logo
By

कोकण शिक्षक मतदारसंघ

महाविकासतर्फे शेकापचे
बाळाराम पाटील उमेदवार
दिग्जजच्या उपस्थितीत अर्ज दाखल

नवीन पनवेल, ता. ११ : विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या ३० ला आहे; तर मतमोजणी दोन फेब्रुवारीला आहे. महाविकास आघाडीतर्फे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मविआच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आज कोकण आयुक्त कार्यालयात पाटील यांनी अर्ज दाखल केला.
कोकण विधान परिषद मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा समावेश होतो. कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांची मुदत सात फेब्रुवारीला पूर्ण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), पुरोगामी शिक्षक संघटना, टी.डी.एफ., महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते.

२०१७ मधील निवडणुकीचा निकाल
*पक्ष, संघटना *उमेदवार *मते
*शेकाप *बाळाराम पाटील *११,८३७
*शिवसेना *ज्ञानेश्वर म्हात्रे *६,८८७
*शिक्षक परिषद *रामनाथ मोते *५,९८८
*शिक्षक भारती *अशोक बेलसरे *४,५३३

*वर्ष *शिक्षक मतदार
*२०१७ *३७,६०४
*२०२३ *३७, ७३१