निर्देशांक दुसऱ्यांदा घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांक दुसऱ्यांदा घसरले
निर्देशांक दुसऱ्यांदा घसरले

निर्देशांक दुसऱ्यांदा घसरले

sakal_logo
By

निर्देशांक दुसऱ्यांदा घसरले
सेन्सेक्स २३६ अंशांनी पडला
मुंबई, ता. २० ः जागतिक प्रतिकूल परिस्थितीमुळे आज (ता. २०) भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशीही गडगडले. जागतिक मंदीच्या भीतीमुळे सेन्सेक्स २३६.६६ अंशांनी कोसळला; तर ८०.२० अंश पडलेला निफ्टी कसाबसा अठरा हजारांच्यावर टिकून राहण्यात यशस्वी ठरला.
जागतिक आर्थिक परिस्थिती आणि जागतिक शेअर बाजार संमिश्र कल दाखवत असल्यामुळे आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकांना फारशी चमक दाखवता आली नाही. सुरुवात चांगली झाली तरी दुसऱ्या सत्रात विक्रीचा मोठा मारा आल्यामुळे शेअर निर्देशांक गडगडले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६०, ६२१.७७ अंशावर, तर निफ्टी १८,०२७.६५ अंशावर स्थिरावला. आता महत्त्वाच्या खासगी बँकांचे तिमाही निकाल जाहीर होत असल्यामुळे बँक क्षेत्राचे शेअर आज तेजीत होते. मात्र, चांगले निकाल न दिल्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्या तोटा दाखवत होत्या. रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही निकाल येणार असल्यामुळे त्या शेअरबाबतही गुंतवणूकदार अस्वस्थ होते. सेन्सेक्सच्या प्रमुख तीसपैकी वीस शेअरचे भाव कोसळले, तर निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ३६ शेअर्सचे भाव पडले.
आता तिमाही निकालांनंतर शेअरच्या कामगिरीनुसारच त्यांचे भाव वर-खाली होतील; धातू निर्मिती कंपन्या आणि आयटी शेअर चमकदार कामगिरी करतील, तर तिमाही निकालांमुळे खाजगी बँकाही चर्चेत राहतील.
- सिद्धार्थ खेमका, मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस