मुंबई ते सुरथकल दरम्यान १८ विशेष एक्स्प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई ते सुरथकल दरम्यान १८ विशेष एक्स्प्रेस
मुंबई ते सुरथकल दरम्यान १८ विशेष एक्स्प्रेस

मुंबई ते सुरथकल दरम्यान १८ विशेष एक्स्प्रेस

sakal_logo
By

आंगणेवाडी
यात्रोत्सवासाठी
विशेष रेल्वे

मुंबई, ता. ३१ : आंगणेवाडी यात्रोत्सवादरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सुरथकल दरम्यान १८ विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे (०१४५३) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत दर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि सुरथकल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. रेल्वे (०१४५४) सुरथकलहून ४ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत दर शनिवारी संध्याकाळी ७.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या दोन्ही एक्स्प्रेस ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुम्ता, मुरुडेश्वर, भटकल, मूकाम्बिका रोड बैंदूर, कुंडापुरा, उडुपी आणि मुल्की स्थानकांवर थांबेल. या विशेष गाड्यांचे आरक्षण ३१ जानेवारी २०२२ पासून रेल्वे आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहेत.