Anganwadi workers Strike
Anganwadi workers StrikeSakal

Raigad News : रायगड जिल्ह्यात सेविका, मदतनीसांचे काम बंद आंदोलन; संपामुळे अंगणवाड्यांना टाळे

रायगड जिल्ह्याच्या महिला बालविकास मंत्री मंत्रिपदावर आल्यानंतर अंगणवाडी सेविकांना योग्य न्याय मिळेल, अशी अशा होती

Raigad News : भरीव मानधन जाहीर करावा, सामाजिक सुरक्षा मिळावी, अशा वेगवेगळ्या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. अंगणवाडीसेविका, मदतनीस या संपात सहभागी झाल्या आहेत.

त्याचा परिणाम बालकांच्या शिक्षणावर होण्याची भीती निर्माण झाली आहे. अंगणवाड्यांना कुलूप असल्याने परिसरात शुकशुकाट राहणार आहे. लसीकरण मोहीम, गर्भवती माता, स्तनदा मातांचे, लसीकरण,

पोषण आहार, गृहभेटी, सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहाराबरोबर पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने हसत खेळत शिक्षण देणे,

Anganwadi workers Strike
Raigad News : खांबेरेतील पराभव शिंदे गटाच्या जिव्हारी; राष्‍ट्रवादीने विश्‍वासघात केल्‍याचा तालुका प्रमुखाचा आरोप

ई-आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, ऑनलाईन माहिती भरणे, रजिस्टर भरणे, जनजागृतीपर कार्यक्रम राबवणे, सरकारने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबवणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे,

भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवून देणे, किशोरवयीन मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी निधी मिळवून देणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत काम करणे, अशी अनेक कामे अंगणवाडीसेविका करत आहेत.

Anganwadi workers Strike
Raigad Fort Tourism : धुक्याची पसरली झालर, किल्‍ले रायगडावर पर्यटकांचा बहर; सुट्यांमुळे ओघ वाढला

अनेक वर्षांपासून त्या त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. अखेर अंगणवाडीसेविकांनी बेमुदत संपाचे हत्यार उचलले आहे. ४ डिसेंबरपासून त्यांनी संप सुरू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात तीन हजार ९८ अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये तीन हजार ५५४ अंगणवाडीसेविका व मदतनीस म्हणून काम करत आहेत. सोमवारपासून संप पुकारल्याने या अंगणवाड्या बंद आहेत. त्याचा परिणाम बालकांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे.

Anganwadi workers Strike
Raigad News : केंबुर्लीत २०० खाटांचे रूग्णालय; राज्य शासनाकडून मान्यता

घोर निराशा

रायगड जिल्ह्याच्या महिला बालविकास मंत्री मंत्रिपदावर आल्यानंतर अंगणवाडी सेविकांना योग्य न्याय मिळेल, अशी अशा होती. मात्र, तमाम अंगणवाडी सेविकांची घोर निराशा झाली आहे. मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाचा दुवा असणार्‍या अंगणवाडी सेविकांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खंत तालुकाध्यक्ष जीविता पाटील यांनी व्यक्त केली.

अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न शासनस्तरावरील आहेत. सोमवारपासून त्या संपावर गेल्या आहेत. त्याबाबत आयुक्तालय स्तरावर चर्चा सुरू आहे.
- निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com