खिल्लारी

खिल्लारी

घेतली

क्रीडा

५४१३

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स
कोबे, ता. २२ ः सांगली जिल्ह्यातील करगणी येथील ३४ वर्षीय सचिन खिल्लारीने येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत एफ ४६ गटातील गोळाफेकीत नवीन आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकताना गेल्यावर्षी जिंकलेले सुवर्णपदक कायम ठेवले. त्याच्या कामगिरीमुळे भारताने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीही पार केली.
भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत पाच सुवर्णपदकांसह ११ पदके जिंकली असून गेल्यावर्षी पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत तीन सुवर्ण, चार रौप्य व तीन ब्राँझपदके अशी १० पदके जिंकली होती. सचिनने पॅरिस येथे सुवर्णपदक जिंकताना १६.२१ मीटरचा आशियाई विक्रम केला होता. हा विक्रम इतिहास जमा करताना त्याने येथे १६.३० मीटर अंतरावर गोळा भिरकावला.
मंगळवारी भारतीय खेळाडूंनी पाच पदकांची कमाई केली होती. सध्या चीन पदकतालिकेत आघाडीवर ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेचे आणखी तीन दिवस शिल्लक असून भारतीय खेळाडूंना आणखी पदके जिंकण्याची संधी आहे. `आम्हाला आणखी दोन सुवर्णपदकांची अपेक्षा असून १७ पदके जिंकण्याची आशा आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक सत्यनारायणन यांनी दिली. मंगळवारी सुमीत अंतिल, थंगवेलू मरियप्पन आणि एकता बिश्त यांनी सुवर्णपदके जिंकली होती.


एफ ४६ म्हणजे काय
एक किंवा दोन हाताची (मनगटाची) हालचाल कमी असणे किंवा हाताची (मनगटाची) ताकद कमी असणे किंवा हात व पाय नसणे अशा खेळाडूंचा या गटात समावेश होतो. शाळेत असताना एका दुर्घटनेत सचिनच्या डाव्या हाताला दुखापत झाला. गँगरीनमुळे कोपरापासून मनगटापर्यंतच्या हाताला कायमचे अपंगत्व आले.

कोट
सुवर्णपदक जिंकण्याचा ठाम विश्वास होता. त्यामुळे आनंदी आहे. या कामगिरीमुळे मी पॅरिस पॅरा ऑलिंपिकसाठी पात्र झालो असून तिथेही सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास आहे.
- सचिन खिल्लारी, सुवर्णपदक विजेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com