‘टॅफे’ची मॅग्ना ट्रॅक्टर सिरीज बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘टॅफे’ची मॅग्ना ट्रॅक्टर सिरीज बाजारात
‘टॅफे’ची मॅग्ना ट्रॅक्टर सिरीज बाजारात

‘टॅफे’ची मॅग्ना ट्रॅक्टर सिरीज बाजारात

sakal_logo
By

मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टरतर्फे
मॅग्ना ट्रॅक्टर बाजारात
पुणे, ता. २० ः जगातील तिसरी मोठी ट्रॅक्टर कंपनी तथा मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टरचे निर्माते टॅफे ट्रॅक्टर्स ॲण्ड फार्म इक्विपमेंट लिमिटेडने कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात मॅग्ना ट्रॅक्टर सिरीज नुकतीच सादर केली. नवा मॅसी फर्ग्युसन ८०५५ मॅग्ना ट्रॅक्टर, ५० एचपी रेंजमध्ये येतो. मॅग्नाट्रॅक सिरीज स्टाइल, आधुनिक तंत्रज्ञान, शक्ती, कमी ऑपरेटिंग खर्चामध्ये उत्तम कामगिरी बजावतो. हा ट्रॅक्टर मालवाहतुकीसाठी सर्वोत्तम आहे.
मॅग्ना ट्रॅक्टर सिरीज सादर करताना टॅफेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक मल्लिका श्रीनिवासन म्हणाल्या, ‘‘६० वर्षांपेक्षा अधिक काळ टॅफे आणि मॅसी फर्ग्युसन ब्रॅंडने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबर संबंध दृढ केले आहेत. या राज्यातील शेतकरी खूप प्रगतिशील आहेत. ते उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करीत आहेत. शक्तिशाली, कार्यक्षम आणि मालवाहतूक सुलभ करण्यासाठी टॅफेने नवीन मॅग्ना ट्रॅक्टर सिरीज लाँच केली आहे. आम्ही देशाच्या ऊस उत्पादन करणाऱ्या राजधानी कोल्हापूरमध्ये जड मालवाहतूक करणारा प्रीमिअम मॅग्ना ट्रॅक्टर लाँच करत आहोत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.’’
ऊस वाहतूक, बांधकाम माल किंवा जड माल वाहतुकीसाठी सगळ्यात उपयुक्त, मॅग्ना ट्रॅक्टर सिरीज विविध प्रकारच्या कृषी संबंधित कामांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये रीव्हर्सिबल मोल्डबोर्ड प्लो, रोटावेटर, पोस्ट-होल डिगर, थ्रेशर आणि बेलर आदी नवीन कृषी तंत्रज्ञानही त्यात समाविष्ट आहे.