
एलआयसीच्या जीवन शांती प्लॅनमध्ये बदल
‘एलआयसी न्यू जीवन शांती’ची
सुधारित आवृत्ती पाचपासून उपलब्ध
पुणे, ता. ९ : भारतीय आयुर्विमा महामंडळाने जानेवारी २०२३ पासून ‘एलआयसी न्यू जीवन शांती’ या प्लॅनच्या वार्षिक दरात बदल केले आहेत. वाढलेल्या वार्षिक दरांसह या योजनेची सुधारित आवृत्ती पाच जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. उच्च खरेदी किमतीसाठी प्रोत्साहनदेखील वर्धित केले आहे. नवीन दर तीन ते ९.७५ रुपये प्रति एक हजार रुपये असून ते निवडलेल्या स्थगिती कालावधीवर आधारित आहेत.
ही एक सिंगल प्रीमिअम योजना आहे. ज्यामध्ये पॉलिसीधारकाला सिंगल लाइफ आणि जॉइंट लाइफ विलंबित काळासाठी यापैकी निवडण्याचा पर्याय आहे. ही योजना कार्यरत आणि स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी तयार केलेली आहे. ज्यांना स्थगिती कालावधीनंतर भविष्यातील नियमित उत्पन्नाची योजना करायची आहे. गुंतवणुकीसाठी त्यांच्याकडे अतिरिक्त पैसे असलेल्या लोकांसाठीदेखील ही योजना योग्य आहे. विलंबित काळासाठी प्लॅन असल्याने तरुण व्यावसायिक त्यांच्या निवृत्तीची योजना सुरुवातीच्या टप्प्यापासूनच करू शकतात. पॉलिसीच्या सुरुवातीच्या वेळी वार्षिक दरांची हमी दिली जाते. अधिक माहितीसाठी www.licindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा कोणत्याही एलआयसी शाखेशी संपर्क साधा, असे आवाहन एलआयसीकडून करण्यात आले आहे.