टीजेएसबी

टीजेएसबी

टीजेएसबी सहकारी बँकेच्या
ठेवींमध्ये ४०७ कोटींची वाढ
ठाणे, ता. १० ः टीजेएसबी सहकारी बँकेने २२- २०२३ या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवीत रुपये ४०७ कोटींची वाढ तर, कर्जात रुपये ४८८ कोटींची वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२३ रोजी ठेवी रुपये १३ हजार ७४३ कोटी तर, कर्ज पुरवठा रुपये ७ हजार २११ कोटींचा झाला आहे. बँकेने सर्व निकष दरवर्षी प्रमाणे यशस्वीरीत्या पूर्ण करून आत्तापर्यंतचा सर्वोच्च ढोबळ आणि निव्वळ नफा नोंदवला आहे.
दरवर्षीप्रमाणे लेखापरीक्षणाचा आर्थिक निकाल दहा एप्रिल पूर्वी घोषित करण्याची आपली परंपरा टीजेएसबी सहकारी बँकेने यंदाही कायम ठेवत ९ एप्रिल लेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कोरोनाच्या जागतिक आपत्तीनंतरचे संपूर्ण वर्ष आर्थिक बाबतीत आंतरराष्ट्रीय घडामोडीने व्यापलेले होते. या पार्श्वभूमीवर या वर्षीचा बँकेचा ढोबळ नफा रुपये २९१ कोटी आणि निव्वळ नफा रुपये १७३ कोटी इतका झाला आहे. बँकेचा स्वनिधी रुपये एक हजार ५४९ कोटी इतका आहे. बँकेच्या अनुत्पादित कर्जाचे ढोबळ प्रमाण ३.९९ टक्के तर अनुत्पादित कर्जाचे निव्वळ प्रमाण शून्य टक्के आहे, अशी माहिती टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गांगल म्हणाले, ‘‘टीजेएसबी सहकारी बँकेने आपल्या नफ्याच्या सर्वोच्च कामगिरीची नोंद केली आहे. बँकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा, आधुनिक तंत्रज्ञान सेवेविषयीच्या ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा आणि डिजिटल बँकिंगकडे वाढणारा कल लक्षात घेऊन बँकेने टीसीएसच्या सहकार्याने बँकेची सीबीएस प्रणाली लवकरच कार्यान्वित होईल.’’
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे म्हणाले, ‘‘बँकेच्या लक्षणीय नफ्यातील वाढ हे प्रामुख्याने संचालक मंडळाचा व्यवसायिक दृष्टिकोन आणि आणि अधिकारी-कर्मचारी यांचा समर्पित भाव यामुळे शक्य झाले आहे.’’ या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंगवी यांच्यासह संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com