ज्ञानदीप

ज्ञानदीप

ज्ञानदीप सोसायटीने गाठले
पाच हजार कोटींचे उद्दिष्ट
पुणे, ता. १० ः राज्यातील अग्रेसर सहकारी संस्था ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने ३१ मार्चअखेर पाच हजार ५५५ कोटी रुपयांच्या ठेवी आणि कर्ज व्यवसायाचे उद्दिष्ट गाठले असल्याची माहिती संस्थापक, अध्यक्ष विश्‍वनाथ पवार यांनी दिली.
आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी व कर्जामध्ये भरीव वाढ झाली आहे. ३१ मार्चअखेर एकूण ठेवी तीन हजार १८० कोटी व कर्जे दोन हजार ३७५ कोटी रुपये झाली आहेत. तसेच थकबाकी प्रमाण ४.७० टक्के व निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के आहे. त्यामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी निश्‍चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात संस्थेला यश प्राप्त झाले असल्याचे उपाध्यक्ष एकनाथ जगताप यांनी सांगितले. संचालक मंडळाने परिस्थितीनुरूप घेतलेले निर्णय, कर्मचारी व प्रतिनिधी यांचे विभागनिहाय अधिवेशन, कर्मचारी व प्रतिनिधींना सातत्याने दिलेले प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यवसायवृद्धी झाल्याचे सचिव चंद्रकांत ढमाळ यांनी सांगितले. ‘ज्ञानदीप’च्या संपूर्ण महाराष्ट्रात ११० शाखा असून ८८४ कर्मचारी व १२६५ दैनंदिन ठेव प्रतिनिधी कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com