‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण वर्ग

‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण वर्ग

लोगो


‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण वर्ग
पुणे, ता. ७ : एफपीसीची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. भारतामध्ये आजघडीला ४० हजारांहून अधिक एफपीसींची नोंदणी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर १३ जुलैपासून पाच दिवसांचे ‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण आयोजिले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली, व्यवसाय आराखडा स्वरूप, बुक किपिंगचे महत्त्व, शासकीय योजनांची ओळख आणि या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषीसह इतर शाखेतील पदवीधर, एफपीसी संचालक तसेच एफपीसी नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
संपर्क : ८४८४८२२३७७

शिका जर्मन भाषा
जर्मन ही अशी आंतरराष्ट्रीय भाषा आहे, जी शिकल्याने भरपूर करिअर संधी उपलब्ध होतात. याचे कारण जर्मनी ही युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि कॉर्पोरेशन हे जर्मन आहेत. भारत ही त्यांची वाढती बाजारपेठ असल्याने जर्मन भाषा अनुवादक, जर्मन दुभाषी आणि जर्मन प्रशिक्षकांना भारतात नेहमीच मागणी होती आणि पुढेही राहणार आहे. जर्मन शिकल्याने रेझ्युमला वजन प्राप्त होते आणि नोकरीच्या बाजारपेठेतील रोजगार क्षमता वाढते. जर्मनीमध्ये जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधीही उपलब्ध आहेत. या सर्व संधींचा लाभ घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी जर्मन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. जर्मन भाषेचा ६० तासांचा (लेव्हल ए-१) प्रमाणपत्र अभ्यासक्रम १३ जुलैपासून सुरु होत आहे. तीन टप्यांमध्ये हा अभ्यासक्रम होणार आहे.
संपर्क : ८४८४८२२१६६

डिजिटल मार्केटिंग बूट कॅम्प
रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंगची कौशल्ये शिकवणारा विशेष बूटकॅम्प १८ जुलैपासून सुरु होत आहे. डिजिटल मार्केटिंगमुळे कमीतकमी गुंतवणुकीत, ठराविक ग्राहक वर्गापर्यंत अचूकपणे पोहोचता येते. रिअल इस्टेट क्षेत्रात तर ‘मार्केटिंग’चे अधिकच महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित तीन दिवसीय ऑनलाइन बूट कॅम्प आयोजिला आहे. यामध्ये सर्च, डिस्प्ले, रीमार्केटिंग, युट्युब, सोशल मीडिया, लीड जनरेशन, कन्व्हर्जन, पेज लाईक इत्यादी कॅम्पेन कसे चालवावे, लिंक्डडीन, कॅन्व्हा, चॅटजीपीटी यांचा डिजिटल मार्केटिंगमध्ये कसा उपयोग करावा याची माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

विदेशी भाजीपाला लागवड
पारंपारिक भारतीय भाजीपाला लागवडीपेक्षा विदेशी भाज्यांची लागवड हा अधिक फायदेशीर व्यवसाय आहे. वाढती शहरी लोकसंख्या, त्यांची बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि परदेशी पर्यटकांची रोजची वाढती संख्या यामुळे भारतात विदेशी भाजीपाला लागवडीला भरपूर वाव आहे. विदेशी भाज्या कशा वाढवायच्या यावरील सोप्या टिप्स शिकवणारी व विदेशी भाजीपाला उत्पादनाचा परिचय करून देणारी एकदिवसीय कार्यशाळा १३ जुलैला आयोजिली आहे. विदेशी भाज्यांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्याची आणि भाजीपाला बाजारपेठेत यशस्वी होण्याची संधी कार्यशाळेद्वारे प्राप्त होणार आहे. पीक निवडीपासून काढणीनंतरच्या व्यवस्थापनापर्यंत विदेशी भाजीपाला उत्पादन तंत्रावर प्रभुत्व कसे मिळवावे, विदेशी भाज्यांची प्रभावीपणे जाहिरात आणि विक्री करण्यासाठी मार्केटिंग कसे करावे आणि चॅनेल कसे कार्यान्वित करावे, विदेशी भाजीपाल्याच्या जाती, लागवडीचे तंत्र आणि काढणीनंतरच्या हाताळणी, स्थानिक आणि प्रादेशिक बाजारपेठांमध्ये विदेशी भाज्या ठेवण्यासाठी आणि विकण्यासाठी प्रभावी मार्केटिंग आदी बाबींबद्दल कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com