एसआयआयएलसी प्रशिक्षण

एसआयआयएलसी प्रशिक्षण

प्रमाणपत्र नसलेल्या एजंटांवर
महारेराचा कारवाईचा बडगा
पुणे, ता. ८ ः प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटांवर धडक कारवाई करत तब्बल २० हजार एजंटांची नोंदणी महारेराने नुकतीच रद्द केली आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटांकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटांकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच १५ जुलैला सुरू होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५.

जाणून घ्या लाकडी घाणा खाद्य तेल प्रक्रिया, व्यवसाय
लाकडी घाणा तेल उद्योग या पारंपरिक व्यवसायाला सध्या आरोग्यासंबंधी झालेल्या जागृतीमुळे चांगले दिवस आले आहेत. केमिकलविरहित तेलापेक्षा लाकडी घाणा किंवा यांत्रिक घाणा वापरून कोल्ड प्रेस ऑइल खाण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. कमी गुंतवणुकीत करता येणाऱ्या, वाढती मागणी असणाऱ्या या लघु उद्योगाचे प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण येत्या १३ आणि १४ जुलैला सकाळ-अॅग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे आयोजिले आहे.
प्रशिक्षणात लाकडी घाण्यावर शेंगदाणा, तीळ व खोबरे यांचे तेल उत्पादन कसे घेतात, तेल प्रक्रिया कशी होते, पेंड कशी काढतात, पाण्याचे प्रमाण कसे असावे इत्यादीविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन होणार आहे. तसेच लाकडी घाण्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या कोल्ड प्रेस एक्स्पेलर मशिनची माहिती दिली जाणार आहे. लाकडी घाण्यापेक्षा यात मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन घेता येते, पेंड पातळ निघते व योग्य दारात कोल्ड प्रेस्ड फिल्टर्ड ऑइल म्हणून विकता येते. लाकडी घाणा युनिट तसेच कोल्ड प्रेस एक्स्पेलर युनिटला प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. प्रशिक्षण सशुल्क आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ८४८४८११५४४

प्रशिक्षणातील विषय
कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे काय
तेल उत्पादन, प्रक्रिया प्रकार
तेल बियांच्या जाती, पॅकिंग व ब्रँडिंग
आवश्यक मशिनरी
पेंड प्रक्रिया व विक्री
व्यवसायाचे अर्थशास्त्र
सोशल मीडियाद्वारे मार्केटिंगच्या पद्धती

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून, त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com