महारेरा परीक्षेसाठी अर्ज करण्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक

महारेरा परीक्षेसाठी अर्ज करण्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक

लोगो


महारेरा परीक्षेसाठी अर्ज करण्याचे
शेवटचे काही दिवस शिल्लक
पुणे, ता. ४ : महारेरा सक्षमता प्रमाणपत्र सर्व रिअल इस्टेट एजंट आणि रिअल इस्टेट व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनिवार्य आहे. यासाठी महारेरा मान्यताप्राप्त संस्थेमार्फत होणारे २० तासांचे ऑनलाइन वा ऑफलाइन प्रशिक्षण पूर्ण करून ‘आयबीपीएस’तर्फे होणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल १४ एप्रिलपर्यंत खुले आहे. पाचव्या टप्प्यातील या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने ८ एप्रिलला सुरू होणारे प्रशिक्षण हे शेवटचे असणार आहे. दोन दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण सकाळनगर, पुणे येथे होणार असून, पाच दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण झूम प्लॅटफॉर्मद्वारे होईल. ज्या नोंदणीकृत एजंटांकडे सक्षमता प्रमाणपत्र नसेल त्यांची रेरा नोंदणी रद्द होऊ शकते, असा इशारा महारेराने दिला आहे. परीक्षा पोर्टल तब्बल ४ महिन्यांनंतर उघडले आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची ही अखेरची संधी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२, ८९५६३४४४७५.

शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी व महसूल
शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमुना आदी शेतजमीनविषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्याचा उपयोग आणि वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, खरेदी, कायदे आणि पळवाटा, तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाईन कसे मिळवावेत, विविध ऑनलाईन उपलब्ध साधने कशी वापरावी, महारेरा आदींविषयी माहिती देणारी कार्यशाळा रविवारी (ता. ७) होणार आहे. कार्यशाळेला रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करतील. जमीन मालक, गुंतवणूकदार, प्रॉपर्टी एजंट आदींसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क ः ९३५६९७३४२७.

हायड्रोपोनिक्स पद्धतीने पिकवा भाजीपाला
देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती, सलाडसाठीच्या भाज्या आदी प्रकारचा भाजीपाला हायड्रोपोनिक्स पद्धतीने घरच्या घरी कसा घ्यावा, याविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. ६) होणार आहे. हायड्रोपोनिक्स पद्धतीत पोषकद्रव्ये आणि पाणी यांचा वापर करून मातीच्या वापराशिवाय पिके वाढवता येतात. कार्यशाळेत घरगुती हायड्रोपोनिक्सचे फायदे व पारंपरिक पद्धती, वेगवेगळे प्रकार व त्यातून योग्य प्रकार कसा निवडावा, योग्य कृत्रिम लाईट कशी निवडावी, घरच्या घरी हायड्रोपोनिक्स युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, त्यासाठी लागणारे साहित्य, हायड्रोपोनिक्ससाठी रोपे कशी तयार करावीत, न्यूट्रियंट सोल्युशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमान यांचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय, रोग व कीड ओळख व नियंत्रण आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळेला सल्लागार अक्षय घोरपडे मार्गदर्शन करतील.
संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२.
सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून, त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com