वैद्यकीय अभ्यासक्रमांबाबत मिळवा योग्य माहिती

वैद्यकीय अभ्यासक्रमांबाबत मिळवा योग्य माहिती

वैद्यकीय अभ्यासक्रमांबाबत मिळवा योग्य माहिती

‘सकाळ विद्या’तर्फे उद्या चर्चासत्र; विद्यार्थी, पालकांना सहभागाचे आवाहन

पुणे, ता. १० : वैद्यकीय अभ्यासक्रमांतील संधी, अभ्यासक्रमांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, देशासह देशाबाहेर वैद्यकीय अभ्यासक्रम करायचा असल्यास त्याची निवड कशी करावी, याबाबत माहिती आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी विद्यार्थी-पालकांनी ‘सकाळ विद्या’ यांच्यातर्फे रविवारी (ता. १२) आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात सहभागी व्हावे. या कार्यक्रमात देश-विदेशातील वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबतचे तज्ज्ञ नीरज कुमार मार्गदर्शन करणार आहेत.
‘सकाळ विद्या’तर्फे आयोजित आणि वे टू ॲडमिशन यांच्यामार्फत हे चर्चासत्र होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांबाबत तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यात मिळू शकणार आहेत. गेल्या १८ वर्षांपासून नीरज कुमार विद्यार्थी-पालकांना वैद्यकीय अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेण्याची ही सुवर्णसंधी विद्यार्थी-पालकांसाठी असणार आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी देशासह परदेशात पाठविण्यास इच्छुक असतात. याबाबत योग्य माहिती आणि मार्गदर्शन या चर्चासत्रातून तुम्हाला मिळणार आहे.
‘सकाळ विद्या’ आयोजित हे चर्चासत्र रविवारी शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा आणि नोंदणी करा. वैद्यकीय अभ्यासक्रमांबरोबरच नीट प्रवेश परीक्षा, वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या अन्य संधी याबाबत विशेष मार्गदर्शन चर्चासत्र मिळू शकणार आहे.

चर्चासत्राविषयी...
- वक्ते व मार्गदर्शक : नीरज कुमार
- केव्हा : रविवार (ता. १२)
- कधी : सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत
- कोठे : मॉडर्न महाविद्यालय सभागृह, शिवाजीनगर, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१०९८४४८, ९३२४१२१८११.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com