रिअल इस्टेट गुंतवणूक व पैसा

रिअल इस्टेट गुंतवणूक व पैसा

लोगो

रिअल इस्टेट गुंतवणूक व पैसा
पुणे, ता. ११ : पैसा कमविण्यासाठी गुंतवणूक पर्याय म्हणून रिअल इस्टेट क्षेत्राकडे कसे पाहावे, यातील धोके कोणते, काळजी काय घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १९ मे रोजी आयोजित केली आहे. यामध्ये सवलतीच्या प्रॉपर्टीज कशा शोधाव्या, रिअल इस्टेटमधील निवासी व व्यावसायिक मालमत्तांचे व्यवहार व गुंतवणूक कशी करावी, गुंतवणुकीचे पर्याय व परतावा, बाजार संशोधन व स्पर्धक विश्लेषण, ग्राहक शोधणे, वित्त व कर व्यवस्थापन, कमी भांडवलामध्ये सुरक्षित नफा कमविण्यासाठीचे पर्याय, आदी विषयांवर रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत नोटस् दिल्या जातील आणि १०० टक्के व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक उदाहरणांसह माहिती दिली जाईल.
संपर्क : ९३५६९७३४२७

व्यावसायिक मसाले कार्यशाळा
घरगुती चवीचे झणझणीत कोल्हापूर स्टाईल मसाले प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा १८ व १९ मे रोजी आयोजित केली आहे. यात १० प्रकारचे मसाले प्रत्यक्षात शिकविले जातील. त्याच्या नोटस् पुरविल्या जातील. पहिल्या दिवशी बिर्याणी, चिकन, मटण, चाट, किचन किंग, मालवणी कोकणी, काळा, कोल्हापुरी कांदा-लसूण, मिसळ, गोडा, पेरीपेरी, गरम इत्यादी मसाले प्रात्यक्षिकासह शिकविले जातील. दुसऱ्या दिवशी मसाला व्यवसाय उभे करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्च्या मालाची खरेदी व उपलब्धता, मसाला व्यवसायाला असणारी मागणी व त्याचे स्वरूप, बाजारपेठ, मार्केटिंगच्या पद्धती, मसाला व्यवसायासाठी लागणारी जागा, प्रोजेक्ट रिपोर्ट, मशिनरी, कॉस्टिंग, आदींविषयी माहिती दिली जाईल.
संपर्क : ९१४६०३८०३१

नॉन-व्हेज स्टार्टर ऑनलाईन कार्यशाळा
मुख्य आहार सुरू करण्यापूर्वी हॉटेल्समध्ये लज्जतदार व क्रिस्पी स्टार्टर्स ऑर्डर केले जातात. हेच स्टार्टर्स तयार करण्यास शिकून मित्र व नातेवाइकांना रुचकर ट्रीट देण्याची संधी आहे. रसरशीत आणि बटरी कबाब आणि टिक्का कसे तयार करावेत, याबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाईन कार्यशाळा १९ मे रोजी आयोजित केली आहे. यात तंदुरी चिकन, मुर्ग मलाई टिक्का, चिकन पहाडी टिक्का, चिकन अंगारा कबाब, सिख कबाब, शामी कबाब, लच्छा कांदा व पुदिना चटणी हे पदार्थ शिकलिले जातील. परिपूर्ण मॅरिनेशन कसे करावे, यांसह इतर सर्व सिक्रेट टिप्स व ट्रिक्स सांगितल्या जातील. कार्यशाळेपूर्वी पीडीएफ नोटस् शेअर केल्या जातील.
संपर्क : ८९५६३४४४७२

पालक-विद्यार्थी करिअर मार्गदर्शन
असंख्य विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करून करिअरची योग्य दिशा दाखविणारे प्रसिद्ध समुपदेशक प्रा. विजय नवले यांची चार तासांची कार्यशाळा १९ मे रोजी आयोजित केली आहे. कार्यशाळेत विविध करिअरची तोंडओळख, विविध कार्यक्षेत्रे, प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, पदे, पदव्या यांचा परिचय, करिअरची निवड कशी करावी, याचे तंत्र, सद्यःस्थितीचा विचार करून संधी व वाव असलेले करिअर कोणते, यांविषयी मार्गदर्शन होणार आहे. शंका निरसन करून व कृती कार्यक्रम ठरविला जाणार आहे. ही कार्यशाळा केल्यास अन्य कोणत्याही समुपदेशनाची गरज उरणार नाही व करिअर संबंधीचे संभ्रम दूर होतील, याची काळजी घेतली जाणार आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षण सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com