सकाळ कनेक्ट

सकाळ कनेक्ट

वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रमाणपत्र प्रशिक्षण
पुणे, ता. ७ : वाईल्डलाईफमध्ये काम करीत असलेली ‘नेमोफिलिस्ट’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकेंडला चालणारे चार दिवसांचे वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रशिक्षण १६ जूनपासून आयोजित केले आहे. हा निसर्गप्रेमी छायाचित्रकारांसाठी डिझाईन केलेला एक इमर्सिव्ह फोटोग्राफी कोर्स आहे. प्राण्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात फोटो काढण्याचे आवश्यक तंत्र, रचना, प्रकाश योजना, कॅमेरा सेटिंग, पोस्ट प्रोसेसिंग, वन्यजीवांचे छायाचित्र काढताना प्राणी व पर्यावरणाला कमीतकमी त्रास होईल याची खात्री करून नैतिक पद्धती आणि जबाबदार वर्तनाने फोटोग्राफी कशी करावी, आदी बाबी प्रात्यक्षिकांसह अनुभवी वन्यजीव छायाचित्रकारांकडून प्रशिक्षणात शिकायला मिळणार आहेत. क्लासरूम ट्रेनिंगसह नैसर्गिक अधिवासांमध्ये हँड्स-ऑन फोटोग्राफी सत्रे प्रशिक्षणादरम्यान होणार आहेत. फोटोग्राफीला सुरुवात केली असेल अथवा यात तज्ज्ञ असाल आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफीचे जग एक्सप्लोअर करायचे असेल; तर हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणारे आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२.

बेकरी उत्पादने प्रक्रिया अन् व्यवसाय संधी
इतर व्यवसायांच्या तुलनेत बेकरी व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. थोड्याशा गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. वाढत्या मागणीमुळे बेकरी उत्पादनांना चांगली बाजारपेठ आहे. भरपूर संधी असणाऱ्या या व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण १५ व १६ जूनला आयोजित केले आहे. प्रशिक्षणात बेकरीमध्ये तयार केली जाणारी टोस्ट, पाव, बन, केक, बिस्‍किट तसेच केक व बिस्‍किटची सजावट इ. उत्पादने, नवीन बेकरी उद्योग सुरू करण्याचे तंत्र व त्याचे व्यवस्थापन, मूल्यवर्धित पदार्थ बनविण्याचे तंत्र, त्यासाठी लागणारी यंत्रे, पायाभूत सुविधा, प्रोजेक्ट प्लॅनिंग, पॅकेजिंग, लेबलिंग इ.विषयी मार्गदर्शन होणार आहे. या लघु उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक इ. विषयी टर्नकी प्रोजेक्ट सल्लागार मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय बेकरी प्रॉडक्टचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहता येण्यासाठी बेकरी इंडस्ट्रीजला फिल्ड व्हिजिटचे नियोजन केले आहे. उद्योजक, नवउद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी इ.साठी प्रशिक्षण फायदेशीर आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१.

टेरॅरियम मेकिंग कार्यशाळा
घराची शोभा वाढविणारे टेरॅरियम घरच्या घरी सहज तयार करता येऊ शकतात. यासाठी लागणाऱ्या विविध वनस्पती कुठल्याही रोपवाटिकेत सहज उपलब्ध होतात. याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. ९) आयोजित केली आहे. कार्यशाळेत टेरॅरियमच्या अद्‍भूत जगाचा परिचय, इकोसिस्टिमचे कार्य, योग्य कंटेनर व वनस्पती निवड, मातीची रचना व सब्सट्रेटची निवड, सजावटीचे घटक व लँडस्केपिंग, टेरॅरियम एकत्र करणे व लावणे, पाणी देण्याची आणि देखभाल पद्धती, कीटक व्यवस्थापन, प्रगत टेरॅरियम डिझाईन व तंत्र, टेरॅरियम लायटिंग व पर्यावरणविषयक विचार, टेरॅरियम डिझाईनची तत्त्वे व सौंदर्यशास्त्र, टेरॅरियम थीम व प्रेरणा, टेरॅरियम विक्री व विपणन धोरणे आदींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८९५६३४४४७२.

सी-फूड डिशेस ऑनलाईन कार्यशाळा
मासे हे प्राचीन काळापासून लोकांच्या खाद्य संस्कृतीचा भाग आहेत. त्यातील उच्च पोषणमूल्ये आणि चवीमुळे आहारात त्यांचा समावेश करावा, असा सल्ला आता आरोग्यतज्ज्ञ देत आहेत. मधुर व रसाळ सी-फूड पाककृती शिकवणारी ऑनलाईन कार्यशाळा रविवारी (ता. ९) होणार आहे. कार्यशाळेत माशांचे मॅरिनेशन व त्याचा मसाला तसेच स्वयंपाकाचे व मासे तळण्याचे योग्य तंत्र यासह अस्सल मालवणी फिश करी, कोकणी फिश करी, तवा फिश फ्राय, कोळंबी कोळीवाडा, कोळंबी पुलाव, अस्सल सोलकढी या सी-फूड डिशेस शिकविण्यात येतील. कार्यशाळेपूर्वी पीडीएफ नोट्स शेअर केल्या जातील.
संपर्क : ९१४६०३८०३१.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com