प्रमाणपत्र मिळवून बना महारेरा नोंदणीकृत एजंट

प्रमाणपत्र मिळवून बना महारेरा नोंदणीकृत एजंट

प्रमाणपत्र मिळवून बना महारेरा नोंदणीकृत एजंट
पुणे, ता. २ : महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. तसेच ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नसेल त्यांची रेरा नोंदणी निलंबित होऊ शकते, त्यांना प्रवर्तकांसोबत काम करण्यासाठी अडचणी होऊ शकतात आणि महारेरातर्फे दंड होण्याची शक्यता आहे. हे सर्व टाळायचे असेल व नोंदणीकृत रेरा एजंट व्हायचे असेल तर २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच येत्या सोमवारपासून (ता. ६) सुरू होत आहे.
संपर्क : ९१३००७०१३२, ८९५६३४४४७५

व्यावसायिक इन्स्टंट पीठे व इन्स्टंट प्रीमिक्स
सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड प्रीमिक्स तयार करण्यास शिकवणारी प्रात्यक्षिकांवर आधारित एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी (ता. ४) आयोजित केली आहे. यामध्ये इन्स्टंट इडली पीठ, डोसा पीठ, उडीद वडा, गुलाबजामून, आइस्क्रीम, फालुदा, नाचणी डोसा, नाचणी इडली, रबडी, तंदूर, ढोकळा, चटणी, मंचुरियन, केक, पकोडा हे प्रीमिक्स पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळा पूर्ण केल्यास नोट्स व डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
संपर्क : ९३५६९७३४२७

लँडस्केप डिझाईनिंग ऑनलाइन अभ्यासक्रम
विमानतळ, शहरातील रस्ते, चौक, व्यावसायिक ठिकाणे, हॉटेल्स, उद्याने, रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्थांचा परिसर इथपासून ते घराचा एखादा छोटासा कोपरा जिवंतपणे सुशोभित करण्यासाठी ‘लँडस्केप प्लॅनिंग व डिझाईनिंग या विषयातील कौशल्य आत्मसात करून त्यात करिअर करण्याला भरपूर वाव आहे. या पार्श्वभूमीवर याबाबतचा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम १८ मेपासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग, आर्किटेक्चर पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर त्याचबरोबर लँडस्केप कन्सल्टंट यांना डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे. लेखीबरोबरच प्रात्यक्षिक अनुभवासाठी विविध रचनेच्या उद्यानांना, साइट प्रोजेक्टला फिल्ड व्हिजिट असणार आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६

रिअल इस्टेट मास्टरक्लास व डिजिटल मार्केटिंग सेमिनार
रिअल इस्टेट क्षेत्रात कौशल्य, भरपूर पैसे व नाव कमवायची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच आयुष्यभर स्थिर व्यवसाय हवा आहे, अशा सर्वांसाठी रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटरशिप प्रोग्रॅम १३ मे रोजी सुरू होत आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत किंवा वयाची अट नाही. तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील मार्केटिंगचे महत्त्व लक्षात घेऊन खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षणही लवकरच सुरू होणार आहे. या दोन्ही प्रशिक्षणांसंदर्भात अधिक माहिती देणारा सेमिनार ८ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाच यावेळेत आयोजित केला आहे. सेमिनारला मास्टरक्लासचे प्रशिक्षक रोहित गायकवाड व डिजिटल मार्केटिंगच्या प्रशिक्षक प्रियंका पवार मार्गदर्शन व उपस्थितांचे शंकानिरसन करणार आहेत. चहा व जेवण यासह सेमिनारचे प्रतिव्यक्ती शुल्क ५०० रुपये आहे. सेमिनार पूर्ण झाल्यास वरील दोन्ही प्रशिक्षणांसाठी आकर्षक सवलत उपलब्ध असेल.
संपर्क : ९५०३६५५२७७

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com