पटकथा लेखन कार्यशाळा

पटकथा लेखन कार्यशाळा

Published on

लोगो

पटकथा लेखन कार्यशाळा
चित्रपट क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कलावंतांना पटकथा लेखनाविषयीची माहिती असणे गरजेचे असते. एखाद्या संकल्पनेवरून चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी व्यक्तिरेखांकन, कथा, पटकथा आणि संवाद लेखन यांचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. चित्रपट उद्योग क्षेत्रात उत्तम पटकथा लेखकांची खूप मागणी आहे. या पार्श्वभूमीवर दोनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा २८ व २९ जूनला आयोजिली आहे. यामध्ये पटकथा लेखनाची प्रक्रिया व त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

थेट उद्योगामध्ये शिका पौष्टिक चिक्की
सध्याच्या जीवनशैलीत आरोग्यदायी, पारंपरिक व स्वादिष्ट पदार्थांना मोठी मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर चिक्कीसारख्या पौष्टिक आणि टिकाऊ पदार्थाचा व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. बाजारात वाढती मागणी लक्षात घेता, थेट उद्योगाच्या पुढाकाराने नावीन्यपूर्ण व पौष्टिक चिक्की बनवण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळा २९ जून रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत राजगिरा, शेंगदाणा, मलई, गुलकंद, पंढरपुरी, तीळ आणि कोकोनट इत्यादी चिक्कीचे प्रकार शिकवले जाणार आहेत. याशिवाय, चिक्की व्यवसायासाठी लागणारी मशिनरी, पॅकिंग, लेबलिंग आणि एकूण गुंतवणूक याचे सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेत थेट उद्योगाच्या मार्गदर्शकांकडून दिले जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४

सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअरची सुवर्णसंधी
चित्रपट वा दूरचित्रवाणी क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवोदितांसाठी महत्त्वाची असणारी व्यावसायिक छायांकन (सिनेमॅटोग्राफी) कार्यशाळा ५ व ६ जुलैला आयोजिली आहे. आजच्या दृश्यमान (व्हिज्युअल) माध्यमप्रधान जगात, चलचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) या करिअरला सध्या भरपूर मागणी आहे. तसेच सध्या इन्स्टाग्राम, यूट्यूब या समाज माध्यमांवरती जे सामग्री निर्माते (कंटेंट क्रिएटर्स) आहेत त्यांनाही या क्षेत्रातील कुशल व्यक्तींची गरज आहे. कार्यशाळेमध्ये कॅमेरा हाताळणी, फ्रेमिंग, लाइटिंग आणि कॉम्पोझिशनची मूलतत्त्वे, शॉट्सचे प्रकार आणि त्यांच्या मूव्हमेंट्स यावर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. तसेच, सहभागींसाठी प्रत्यक्ष शूटिंगचा सरावही होणार आहे. कार्यशाळा प्रात्यक्षिकांवर आधारित व इंडस्ट्री-ओरिएंटेड आहे. त्यामुळे चित्रपट, जाहिरात, वेब सीरिज, माहितीपट इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रवेशासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

बांधकाम व्यवस्थापनातील करिअरवर विनामूल्य चर्चासत्र
बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन हा विषय शिकविताना अनेक कौशल्यांचा जसे की प्रात्यक्षिके, बांधकाम प्रकल्पात काम करण्यासाठी आवश्यक व्यक्तिगत कौशल्ये आणि साईटवरील मनुष्यबळाचा योग्य वापर कसा करावा आदी घटकांचा अभाव दिसतो. दुसरीकडे याच कौशल्यांत पारंगत अशा उमेदवारांची वाढती मागणी आहे. याविषयीचे शिक्षण व नोकरीची संधी देणारा एक वर्षाचा आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण असलेला अभ्यासक्रम ऑगस्टमध्ये सुरू होत आहे. हा अभ्यासक्रम व या क्षेत्रातील नवीन करिअर संधींविषयी मार्गदर्शन करणारे विनामूल्य चर्चासत्र सहा जुलैला आयोजिले आहे. चर्चासत्राला क्रेडाईचे उपाध्यक्ष जे. पी. श्रॉफ, शापुरजी पालनजी ग्रुपचे स्ट्रॅटेजी व बिझनेस एक्सलन्स प्रमुख सागर गांधी, ओमान येथील अल करार चे संचालक हेमंत सर्वभोटला मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क ः ७७२००७५७६२, ७७५८८२५७३७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com