एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

Published on

सिनेमॅटोग्राफीमध्ये घडवा करिअर
चित्रपट वा दूरचित्रवाणी क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवोदितांसाठी महत्त्वाची असणारी व्यावसायिक छायांकन (सिनेमॅटोग्राफी) कार्यशाळा ५ व ६ जुलैला होणार आहे. आजच्या दृश्यमान (व्हिज्युअल) माध्यमप्रधान जगात, चलचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) या करिअरला सध्या भरपूर मागणी आहे. तसेच सध्या इंस्टाग्राम, यूट्यूब या समाज माध्यमांवरती जे सामग्री निर्माते (कंटेंट क्रिएटर्स) आहेत त्यांनाही या क्षेत्रातील कुशल व्यक्तींची गरज आहे. कार्यशाळेमध्ये कॅमेरा हाताळणी, फ्रेमिंग, लाइटिंग आणि कॉम्पोझिशनची मूलतत्त्वे, शॉट्सचे प्रकार आणि त्यांच्या मुव्हमेंट्स यावर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. तसेच सहभागींसाठी प्रत्यक्ष शूटिंगचा सरावही होणार आहे. कार्यशाळा प्रात्यक्षिकांवर आधारित व इंडस्ट्री-ओरिएंटेड आहे. त्यामुळे चित्रपट, जाहिरात, वेब सिरीज, माहितीपट इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रवेशासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरणार आहे. संपर्क : ८४८४८११५४४

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला
व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा इ.विषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ५ व ६ जुलै रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, हायड्रोपोनिकसाठी रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्युशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमान यांचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. संपर्क : ८४८४८११५४४

अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास प्रशिक्षण
अन्न प्रक्रिया उद्योग हे क्षेत्र उत्पादन, खप, रोजगार आणि निर्यात या दृष्टीने मोठे क्षेत्र आहे. उद्योगातील इतर क्षेत्रांपेक्षा नफ्याचे प्रमाणही अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये जास्त आहे. यासंबंधी मार्गदर्शन करणारे तीनदिवसीय प्रशिक्षण ५, ६ व ७ जुलैला होणार आहे. प्रशिक्षणात उद्योग व स्टार्टअप स्थापना, ब्रँडिंग, विक्री व प्रसार, निर्यात उद्योगातील संधी, शासकीय योजना, अनुदान, कागदपत्रे, अन्नप्रक्रिया उद्योग व्यवस्थापन, बँक कर्जे व अनुदान इत्यादी बाबींवर मार्गदर्शन तसेच लहान, मध्यम व मोठ्या अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रत्यक्ष भेट, फळे, लोणचे व मसाले यांचे अन्न प्रक्रिया प्रात्यक्षिक होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

एफपीसी सीईओ प्रशिक्षण वर्ग
एफपीसींची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, व्यवसाय नियोजन करणे, बाजार नियोजन करणे, मनुष्यबळ व्यवस्थापन करणे अशी जबाबदारी सीईओ पदावर असते. या पार्श्वभूमीवर ११ जुलैपासून पाच दिवसांचे एफपीसी सीईओ प्रशिक्षण आयोजित केले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषीसह इतर शाखेतील पदवीधर, एफपीसी संचालक, तसेच एफपीसी नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. संपर्क : ८९५६७१२६३१, ९१५६०१००६०

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com