शिंदे सरकारची मोठी घोषणा! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

शिंदे सरकारची मोठी घोषणा! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत दि. ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर हा शासन निर्णय घेण्यात आला असून यासाठीचे पासेस, स्टिकर्स पोलीस परिवहन विभागाकडे उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: शिवसेनेशी युती करणाऱ्या संभाजी ब्रिगेडबद्दल माहितीये का?

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने टोल सवलतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

दिनांक २७ ऑगस्ट ते दिनांक ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा. म. ६६) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना टोल सवलत देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

हेही वाचा: Congress: गुलाम नबी आझादनंतर काँग्रेसच्या आणखी पाच बड्या नेत्यांचा राजीनामा

या टोलमाफीसाठी "गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

Web Title: Toll Free For Ganeshbhakt Going To Kokan Eknath Shinde Announcement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..