उद्या हरिनाम सप्ताह

उद्या हरिनाम सप्ताह

‘सोंबा रेडजाई’ मंडळाचा
हरिनाम महोत्सव उत्साहात

रत्नागिरी ः तालुक्यातील साठरेबांबर-लावगणवाडी येथे सोंबा रेडजाई भजन मंडळतर्फे नुकताच हरिनाम महोत्सव उत्साहात साजरा झाला. या वेळी व्यासपीठावर आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंळाचे सचिव वासुदेव वाघे, संजय मेस्त्री बुवा, रामदास नाटेकर बुवा सहसचिव शंकर उर्फ दादा वाडेकर, पखवाजवादक संदीप आंबेरकर, लांजा पंचायत समिती माजी सभापती मानसी आंबेकर, साठरेबांबर माजी सरपंच प्रभाकर खोचाडे, वाडीप्रमुख संतोष नाडणकर, गावकर मनोहर खोचाडे, कुणबी समाजसंघ लांजा खजिनदार दिलीप तिखे, कशेळी सरपंच दीपक बावकर, सुनील ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. नामस्मरणाने मानसिक समाधान मिळतेच; पण उत्साहही वाढतो. आज हा सोहळा पाहतानाच मन आनंदित होते, असे उद्गगार मानसी आंबेकर यांनी काढले. हरिनाम हेच आपणाला तारक आहे. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, या भजनाची वाट पाहणारा हा रघुनंदन या हरिनामातच तल्लीन होत असतो. संतोष धनावडे यांच्या कुटुंबीयांनी सुरू केलेली ही हरिनाम महोत्सवाची परंपरा अशीच तेजोमय होत जावो आणि आमच्यासारख्या पामरांना परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळो, अशी प्रार्थना करतो असे उद्गगार अध्यक्षीय भाषणात वाघे यांनी काढले. या वेळी प्रथम सोंबा रेडजाई भजन मंडळ, रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाचे भजन, बालमित्र मंडळ मावळतचे वाडी कशेळी, बावकरवाडी कशेळी या सर्वांनी येऊन भजनसेवा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
------------
rat२९p२३.jpg -
P२४M८६५६१
भास्कर पुरस्कार स्वीकारताना प्रभाकर आरेकर.

प्रभाकर आरेकर यांना
भास्कर पुरस्कार

गुहागर ः महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा दी प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्कार श्री समर्थ भंडारी नागरिक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांना गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आरेकर यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम केले आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव व समाजासाठी काहीतरी करण्याचे उद्देशाने २०२२ मध्ये त्यांनी श्री समर्थ भंडारी नागरिक सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या संस्थेचे एकूण १७ शाखा रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत. आरेकर यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची किसान स्टाफ सोसायटी अध्यक्ष तसेच अनेक वर्ष संचालक पद सांभाळले आहे. ते काही काळ गुहागर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सहकारी बँक कर्मचारी संघ या युनियनचे ते काही काळ अध्यक्ष होते. त्यांना या आधी नॅशनल युनिटी अवॉर्ड, ''सकाळ'' समुहाचा आयडॉल ऑफ महाराष्ट्र बेस्ट चेअरमन पुरस्कार व भंडारी एकीकरण समिती मुंबईचा समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा भास्कर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यापुढेही सहकार क्षेत्रासाठी भरीव योगदान देऊन त्या माध्यमातून समाजाचा आर्थिक उत्कर्ष करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
-----------
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com