'विमानतळाच्या मुहूर्तावरून मूर्ख बनवू नका'

on the topic of chipi airport parshuram uparkar said in press conference in sindhudurg
on the topic of chipi airport parshuram uparkar said in press conference in sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) : जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला ऊर्जितावस्था आणणारे चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांनी केंद्र तसेच राज्य सरकारला एकत्र आणून हा विमानतळ लवकरात लवकर सुरू होईल, यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. जनतेला विमानतळाच्या मुहूर्ताच्या तारखा जाहीर करून मूर्ख बनवू नये, असा सल्ला मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे दिला आहे. येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी उपरकर म्हणाले, 'केंद्र सरकार हे भाजपचे असून नारायण राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी 22 वर्षांपूर्वी विमानतळासाठी दगड लावून भूमिपूजन केले आणि आश्वासने दिली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी तीन वेळा उद्‌घाटन मुहूर्ताच्या तारखा जाहीर केल्या. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विमान उतरवून जनतेची दिशाभूल केली. खऱ्या अर्थाने हा विमानतळ सुरु होण्यासाठी केंद्रीय वाहतूक निर्देशनालय यांचा परवाना असणे गरजेचे आहे. यासाठी केंद्राकडून समिती पाठवून त्याची तपासणी केली जाते. ही तपासणी यापूर्वी झाली होती. त्याची माहिती घेतल्यानंतर आपण जाहीर केले होते की, हा विमानतळ सुरू होण्यासाठी अजून काही महिने लागतील; मात्र, खासदार राऊत हे सातत्याने मुहूर्त जाहीर करत आहेत. 

आता तर 1 मार्चला केंद्रातील खासदारांची एक पथक आले पाहणी करून गेले. त्यांनीही काही त्रुटी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. या त्रुटी पूर्ण करणे आवश्‍यक आहे. याच बरोबर विमानतळासाठी आवश्‍यक असलेले पाणी, वीज, रस्ते हे राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करायला हवेत. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार मधील खासदार राणे आणि राज्यातील शिवसेना महाविकास आघाडीचा सरकारमधील खासदार विनायक राऊत यांनी जर एकत्र येऊन हे काम केले तर जनतेची दिशाभूल होणार नाही. केवळ तारीख पे तारीख नको महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी विद्यमान खासदार खोटे बोलत असल्याचे सांगितले होते. ही वस्तुस्थिती आता सिद्ध झाली आहे. हा विमानतळ सुरू करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी केली आहे. आता जनतेला घोषणा नको. आपापसात टीका करण्यापेक्षा खासदारांनी विमानतळ कसा सुरू होईल यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.'

उपरकर म्हणाले, 'कुडाळमधील महिलांचे रुग्णालय सुरू करण्याच्या दोन तीन वेळा घोषणा झाल्या. घोडगे- सोनवडे घाट रस्त्यासाठी 4 कोटीची घोषणा यापूर्वी करण्यात आली; मात्र निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे घाटमाथ्यावरील ग्रामस्थ अजूनही आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा आहे.'

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com