जाणून घ्या चिपळूणातील कोरोनामुक्तीची वाटचाल....

.मुझफ्फर खान
Tuesday, 21 July 2020

एकूण 300 कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी 157 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

चिपळूण (रत्नागिरी) :  तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी कोरोनामुक्तीचा दर देखील उत्तम असल्याचे समोर आले आहे.तालुक्यात आतापर्यंत एकूण 300 कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी 157 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुक्तीचा दर तब्बल 57.70 टक्यावर पोहचला आहे. सध्या 107 रुग्णावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली आहे.

देशात कोरोनाने हाहाकार उडवलेला असताना महाराष्ट्रातदेखील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत होती. सुरुवातीच्या टप्प्यात चिपळूण तालुका कोरोनापासून दूर होता. मात्र, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ग्रामीण भागात मुंबईहून आलेला एकाला कोरोनाची बाधा झाली. यानंतर ग्रामीण भागामध्ये टप्प्याटप्प्याने कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागले. त्यावेळी चिपळूण शहर कोरोनापासून मुक्त होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात चिपळूण शहरात देखील कोरोनाग्रस्त रुग्ण सापडू लागले.

हेही वाचा- त्या बैठकीला उपस्थित होते नाईक  : पालकमंत्री उदय सामंतसह वरिष्ठ  अधिकारी यांच्यावर क्वारंटाइनची टांगती तलवार..... -

हा आकडा आता चिपळूण शहर व ग्रामीण भागात 300 च्या पुढे गेला आहे. चिपळूण शहर व ग्रामीण भागात रुग्ण सापडण्याचे प्रमाण सरासरीत राहिले आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिलासादायक आहे. यामध्ये चिपळूण शहरातील आतापर्यंत 66 रुग्ण बरे झाले आहेत. ग्रामीण भागातील 91 रुग्ण असे चिपळूण तालुक्यातील 157 रुग्ण बरे झाले आहेत. आता चिपळूण शहरातील 62 तर ग्रामीण भागातील 45 रुग्णांवर असे एकूण 107 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर चिपळूण शहरातील 3 तर ग्रामीण भागातील 5 असे 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणाले... -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जेथे कोरोना बाधित रुग्ण सापडले तेथे कंटेनमेंट झोन निश्चित केले आहेत. यामध्ये चिपळूण शहरात 37 तर ग्रामीण भागात 28 असे एकूण 66 कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये खेर्डी येथे 11 ठिकाणी, मिरजोळी येथे 3 ठिकाणी, कापसाळ 2 ठिकाणी तर कापरे, केतकी, कोंढे, पेढे, दळवटणे, वालोपे, गोंधळे, परशुराम पिंपळीखुर्द या गावांमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत, पेढांबे कोविड केअर सेंटर मध्ये 58, कामथे रुग्णालयात 28 जिल्हा रुग्णालयात 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा- कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक कोरोना बाधित.... -

रविवारी व सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार 34 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन खासगी डॉक्टरांसह एक परिचारीका असणारी नगरसेविका, एक वकील व 3 कामगारांचा समावेश आहे. डॉक्टर, वकीलांसह लोकप्रतिनिधीही कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total of 300 corona patients were found of which 157 patients have overcome corona.