सुधागडमध्ये पावासाळी पर्यटन बहरले....

अमित गवळे 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पाली - जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी अाणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे.

पाली - जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी अाणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे.

धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यापेक्षा तालुक्यातील सुरक्षित धबधबे, ओढे व धरणे येथे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक पसंती देत आहेत. येथील पिलोसरी येथील घपकी गावाजवळील, उद्धर येथील, आपटवणे, नाडसूर व पडसरे येथील धबधबे पर्यटकांनी गजबजलेले असतात. तसेच उन्हेरे व कोंडगाव येथील धरणांच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात मौजमजा घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करत आहेत. रविवारी व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणा पर्यटक येथे येत असतात. थोडी खबरदारी व अतीउत्साह टाळल्यास शाळकरी, लहानमुले, महिला व तरुणांसाठी ही ठिकाणे सुरक्षित आहेत. त्यामूळे इतर तालुक्यातील पर्यटक देखिल येथे आवर्जुन येत असतात. त्यामूळे येथील छोटे हॉटेल व्यवसायिक व हातगाडीवाल्यांच्या उत्पन्नात भर पडते. मात्र गर्दिच्या दिवशी येथे पोलीस तैनात ठेवण्यात यावेत अशी मागणी काही नागरीकांनी केली आहे.

तालुक्यातील विविध ठिकाणचे धबधबे खुपच आकर्षक आहेत. दुरवर कोठेही पावसाळी पर्यटनासाठी जाण्यापेक्षा येथे जावून चिंब भिजण्याचा आनंद घेतो. तसेच निसर्गाशी एकरुप देखिल होता येते. कुटूंबिय व महिलांसाठी देखिल हे धबधबे सुरक्षित आहेत. मात्र पर्यटकांनी अती उत्साह टाळावा व येथे कचरा करु नये.
अॅड. नरेश शिंदे, पर्यटक, पाली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourist attracted to sudhagad tourism