दापोलीमध्ये या प्रख्यात बीचवर अनधिकृत वॉटर स्पोर्टस् सुरू असून प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक केली जात असून, एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रामध्ये (Murud Beach) डॉल्फिन पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची बोट उलटली. चालकासह सर्व ११ प्रवाशांनी लाईफजॅकेट घातलेले असल्याने वाचविण्यात यश आले; परंतु एका पर्यटकाची (Tourist) प्रकृती चिंताजनक आहे. रविवार (ता. १६) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.