

Tourists crowd Raigad beaches and hill stations as summer holiday rush peaks across Maharashtra’s popular destinations.
esakal
-अमित गवळे
पाली: जैवविविधतेने नटलेले विलोभनीय निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण समुद्र किनारा तसेच ऐतिहासिक व धार्मिकस्थळे यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. नुकत्याच उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. कमर्शियल सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे खाण्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसत आहे.