esakal | मिशन ब्रेक द चेन : देवरुख बाजारपेठेत गणपती विसर्जनापासून आठ दिवसांचा लाॅकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

Traders and citizens of Devrukh Nagar Panchayat imposed a lockdown from Thursday 27th to Thursday 3rd September

मेडीकल सेवा राहणार सुरु,सकाळी ११ ते २ या वेळेत होणार दुधाची विक्री

मिशन ब्रेक द चेन : देवरुख बाजारपेठेत गणपती विसर्जनापासून आठ दिवसांचा लाॅकडाऊन

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) : देवरुख व साडवली परीसरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता  चेन ब्रेक करण्याठी देवरुख नगरपंचायत हद्दीतील व्यापारी व नागरीकांनी गुरुवार दि.२७ ते गुरुवार दि.३ सष्टेंबर या कालावधीत लाॅकडाऊन म्हणजेच जनता कर्फ्यु लागु केलाा आहे.आरोग्याची काळजी घेण्यासाठीच सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

हेही वाचा- शववाहिका मिळण्यासाठी वेटिंग ; अखेर मृतदेह नेला जीपमधून

दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय
लाॅकडाऊन काळात मेडीकल सेवा नियम व अटी पाळुन सुरु राहणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होलसेल दुध विक्रेते छञपती शिवाजी महाराज चौक, बसस्धानक व माणिक चौक येथे दुध विक्री करणार आहेत. देवरुख बाजारपेठ बंद ठेवावी का यासाठी नगराध्यक्षा सौ.मृणाल शेट्ये यांनी नगरपंचायतीत व्यापारी व नागरीकांची बैठक बोलवलेली होती.याच बैठकीत दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार आठ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला.

हेही वाचा- तडफडणाऱ्या म्हशीसाठी ते धावले अन् घडला अनर्थ.... सिंधुदुर्गात कुठे घडली घटना...वाचा -

यांनी केला लाॅकडाऊन जाहीर


हा लाॅकडाऊन  नागरीक,व्यापारी यांनीच जाहीर केलेला आहे.यामुळे कुणावरही कसलेही बंधन राहणार नसुन आपल्या आरोग्याची काळजी घेवुन आपणच योग्य तो निर्णय घ्यायचा आहे असे सुचित करण्यात आले.या लाॅकडाऊनला  देवरुख व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी व क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी पाठींबा जाहीर केला आहे.नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.गणपती  विसर्जनापासून हा लाॅकडाऊन होणार आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image