गणेशभक्त खोळंबले; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 September 2019

मुंबई-गोवा महामार्गावर पेन ते माणगाव दरम्यान झालेली वाहतूक कोंडी मोठी आहे. या वाहतूक कोंडीमुंळे पहाटे कोकणाकडे निघालेले चाकरमानी अडकून पडले आहेत.

महाड (रायगड): महाड जवळील वडपाले गावाजवळ एका एसटीबसला आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी ही दुर्घटना घडल्याने अनेक समस्यांवर मात करत मोठ्या संख्येने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचा मोठा खोळंबा झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पेन ते माणगाव दरम्यान झालेली वाहतूक कोंडी मोठी आहे. या वाहतूक कोंडीमुंळे पहाटे कोकणाकडे निघालेले चाकरमानी अडकून पडले आहेत.

महाडजवळील वडपाले गावाजवळ कोकणात जाणाऱ्या एका एसटी बसला अचानक आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्याही तितकीच मोठी आहे. अशात ही दुर्घटना घडल्याने कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे २ ते ३ किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic jam on Mumbai Goa highway due to Ganeshotsav 2019