सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी: रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी

सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडी

सावंतवाडी: येथील गार्डनसमोरील तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे मुख्य महामार्गावरून बाजारात येणारा रस्ता बंद करून वाहतूक मुख्य महामार्गावरूनच वळविण्यात आली आहे. आज सकाळच्या सुमारास आठवडा बाजारामुळे येथील चिटणीस नाका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिस हैराण झाले. रखरखत्या उन्हातून वाहनचालकांनी त्या कोंडीतून मार्ग काढला.

येथील मोती तलावात गेले पाच दिवस गाळ काढण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे उद्यानासमोरील बाजाराच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. मुख्य महामार्गावरील बाजाराच्या दिशेने होणारी वाहतूक सरळ मुख्य महामार्गावरूनच वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना संपूर्ण तलावाला प्रदक्षिणा घालूनच बाजारात जावे लागत आहे. आज आठवडा बाजार असल्याने बाजारात नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे चिटणीस नाका परिसरात सकाळच्या सुमारास वाहनांची कोंडी झाली होती.

तिन्ही दिशांनी रांगा

शहरात तिन्ही दिशांनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिस देखील हतबल झाले. एस.टी. महामंडळाच्या गाड्या सध्या खासगी पेट्रोल पंपचा आधार घेत असल्याने नगरपालिकेनजीकच्या पंपावर वाहनांची कोंडी निर्माण झाली. त्यातच रखरखते ऊन असल्याने वाहनचालक हैराण झाले.

Web Title: Traffic Jam Sawantwadi City Traffic Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top