खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात या महामार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम बारा वर्षांपासून जास्त काळ रखडलेले आहे. हे काम २०२५ मध्ये पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्या तुलनेत येथील कामाला वेग आलेला नाही. पावसाळ्यात पुन्हा वेग कमी होणार आहे.