
पावस - तालुक्यातील पूर्णगड येथील एक उत्कृष्ट आणि नावाजलेला कबड्डीपटू मानस आडविरकर याचे सामना खेळताना झालेल्या अपघातानंतर मृत्यू झाला. या अपघातामध्ये त्याच्या मानेला दुखापत झाली होती. अधिक उपचारासाठी त्याला आधी कोल्हापूर आणि नंतर मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. कबड्डीमध्ये जिल्हाभरात त्याने नावलौकिक मिळविला होता. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात तसेच क्रीडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.