शिक्षकांच्या बदल्या, काहींचा आक्षेप! वाचा सिंधुदुर्गातील स्थिती...

विनोद दळवी 
Tuesday, 11 August 2020

दरम्यान, या बदल्या समाधानकारक नसल्याचा आरोप अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य चिटणीस म. ल. देसाई यांनी केला आहे. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 9 व 10 ऑगस्टला समुपदेशन पद्धतीने झाली. बदलीसाठी प्राप्त 287 विनंती अर्जांपैकी 38 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून सर्व बदल्या पारदर्शक व शिक्षकांचे समाधान करणाऱ्या झाल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले. दरम्यान, या बदल्या समाधानकारक नसल्याचा आरोप अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य चिटणीस म. ल. देसाई यांनी केला आहे. 
 

वाचा - शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये दाखल ; नारायण राणेंच्या बंगल्यावर झाला पक्षप्रवेश 

शासनाच्या आदेशानुसार प्रशासकीय बदल्या न करता केवळ विनंती बदल्या 9 आणि 10 रोजी समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सावी लोके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी उपस्थित होते. 

या बदली प्रक्रियेसाठी संवर्ग 1 मध्ये 42 अर्ज आले होते. त्यातील 7 बदल्या झाल्या. संवर्ग 2 मधील 52 पैकी 5 बदल्या झाल्या. महिलांसाठी अवघड क्षेत्र या संवर्ग 3 मधील 19 पैकी 1. अवघड क्षेत्र या संवर्ग 4 मधील बदली अधिकार प्राप्त शिक्षक 19 पैकी 1 बदली झाली आहे. ही बदली प्रक्रिया 9 रोजी झाली. तर बदलीपात्र पति-पत्नी एकत्रीकरण या संवर्ग 5 मधील 11 पैकी 1 बदली झाली आहे. संवर्ग 6 या बदलीपात्र विनंतीसाठी 41 अर्ज आले होते. त्यातील 23 बदल्या झाल्या आहेत. 

हेही वाचा - कणकवलीत कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर उद्यापासून सुरू : वैभव नाईक 

शिक्षक बदलीत समाधान-असमाधान 
जिल्हा परिषद कर्मचारी-अधिकारी बदली विनावाद झाली होती. त्याबाबत कर्मचारी समाधानी आहेत; मात्र शिक्षक बदली समाधानकारक न झाल्याचा शिक्षक संघटनांचा आरोप आहे. तशी प्रतिक्रिया अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे राज्य चिटणीस म. ल. देसाई यांनी व्यक्त केली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांना विचारले असता सर्व प्रक्रिया व्यवस्थित झाल्याचे सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of teachers in Sindhudurg district