एसटीची वाहतूक पूर्वपदावर येतीये ; १ कोटी ८० लाखांचे उत्पन्न

trawelling of state transportation services work properly now above 1 crore rupees received in ratnagiri
trawelling of state transportation services work properly now above 1 crore rupees received in ratnagiri

रत्नागिरी : कोरोना महामारीच्या काळातही प्रवाशांची काळजी घेऊन सुरक्षित वाहतूक करणाऱ्या रत्नागिरी एसटी विभागाला गणपती बाप्पा पावला आहे. विभागाला १ कोटी ८० लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जिल्ह्यातून १४८३ फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यामुळे उत्सवासाठी आलेले चाकरमानी व एप्रिलपासून येथेच अडकून पडलेले मुंबईकर पुन्हा मुंबईला रवाना झाले.

कोरानामुळे २२ मार्चपासून सुमारे तीन - साडेतीन महिने एसटीची सेवा पूर्ण ठप्प झाली होती. कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे एसटी पुन्हा चालू होण्याची आशा मावळली; परंतु सोशल डिस्टन्सिंग व मास्क, सॅनिटायझेशन आदीचा वापर करून ५० टक्के प्रवासी क्षमतेत गाड्या चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे प्रवाशांनाही फायदा झाला. गणेशोत्सवात मुंबईतून फक्त पाच हजार मुंबईकर चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. दीड दिवस व अनंत चतुर्दशीनंतर एसटीने सुरेख नियोजन केले. त्यामुळे १४८३ फेऱ्यांमधून ५६ हजार २७६ मुंबईकर चाकरमानी पुन्हा परतले.

शिमगोत्सवानंतर लॉकडाउन झाल्यामुळे येथेच अडकून पडलेले चाकरमानी आणि एप्रिलपासून परवानगी घेऊन गावी दाखल झालेले मुंबईकर एसटीच्या सुविधेमुळे पुन्हा मुंबईत जाऊ शकले. 
यंदा प्रथमच ग्रुप बुकिंगसाठी मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. १४८३ फेऱ्यांमधून ७ लाख ८६ हजार किलोमीटर्स गाड्या धावल्या. मुंबई, ठाणे, बोरिवली, भांडुप, दादर, नालासोपारा यासह पुण्यामध्येही चाकरमानी रवाना झाले.

हळूहळू मिळतोय प्रतिसाद

एसटीची वाहतूक पुन्हा पूर्वपदावर येत आहे. लांब पल्ला, ग्रामीण वाहतूक व शहरी फेऱ्यासुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी वाहतुकीच्या सध्या ७० फेऱ्या सुरू आहेत. त्याला हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. कोरोनावर लस आल्यानंतर आणि शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा एसटी सेवा सुरळीत होईल, अशी आशा एसटीचे अधिकारी बाळगून आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com