वैभववाडी-फोंडा मार्गावरील दंड खांबाळेत कोसळले झाड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

वैभववाडी - वैभववाडी - फोंडा मार्गावरील खांबाळे दंड येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर झाड कोसळले. हे झाड कोसळताना आर्चिणे येथील एक दुचाकीस्वार अवघ्या 20 फुट अतंरावर होता. तो सुदैवाने बचावला. झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतुक अर्धा तास ठप्प झाली. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झाड हटविल्यानंतर वाहतूक पुर्ववत झाली. 

तालुक्‍यात आज सकाळपासुन मुसळधार पावसासह वादळी वारा सुरू आहे. अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळात वैभववाडी-फोंडा मार्गावरील खांबाळे दंड येथे रस्त्यालगतचे मोठे झाड कोसळुन पडले. कोसळलेल्या झाडाने पुर्ण रस्ता व्यापल्यामुळे या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. बांधकाम विभागाला माहीती मिळाल्यानंतर बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी झाड हटविण्यास सुरूवात केली. अर्ध्यातासानंतर एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी या मार्गावरील वाहतुक पुर्ववत झाली. 
 
धोकादायक झाडे हटविण्याची मागणी 
कुसुर पिंपळवाडी येथे काल (ता.1) सकाळी रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतुक ठप्प झाली होती. तत्पुर्वी नाधवडे येथे देखील रस्त्यावर झाड कोसळले होते. आज पुन्हा खांबाळे दंड येथे झाड कोसळुन वाहतुक ठप्प झाली. त्यामुळे रस्त्याकडेची धोकादायक झाडे तातडीने दुर करावीत, अशी मागणी वाहनचालकांकडुन होत आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree fall incidence on Vaibhawadi - Phonda road

टॅग्स