esakal | आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक जण ठार
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक जण ठार

आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक जण ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साडवली : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ट्रक क्रमांक MH 09 BC7241दरीत कोसळला. पावस वरून हा ट्रक मलकापूर येथे चिरा घेऊन चालला होता. या ट्रक मध्ये चालक, क्लिनर व हमाल असे प्रवास करीत होते. यामध्ये सचिन पाटील (३३ ) हा जागीच ठार झाला.

गायमुखाच्या १ किलोमीटर अलीकडे हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच देवरूख पोलीस निरीक्षक मारुती जगताप हे सुद्धा घटास्थळी पोहचले. रात्री अंधारात साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे रोहित यादव आणि प्रशांत यादव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शना नुसार अंधारात खोल दरीमध्ये उतरून रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना वर काढले आणि अधिक उपचारासाठी आंबा येथील रुग्णालयात दाखल केले.

Edited By- Archana Banage

loading image