Banda : पत्रादेवी तपासणी नाक्यावर ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; चालक पसार, संतप्त जमावाने महामार्ग रोखला..

डॅनी फर्नांडिस (वय २८, रा. इन्सुली-पागावाडी) याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस व अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हा भीषण अपघात होऊनही ट्रक चालक जंगलात पसार झाल्याने डॅनीचा मित्रपरिवार आक्रमक झाला.
Screengrab from Patradevi where locals gathered in protest after a truck fatally hit a biker.
Screengrab from Patradevi where locals gathered in protest after a truck fatally hit a biker.esakal
Updated on

बांदाः मुंबई-गोवा महामार्गावर गोवा पत्रादेवी येथील अबकारी तपासणी नाक्यासमोर दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले. यात डॅनी फर्नांडिस (वय २८, रा. इन्सुली-पागावाडी) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. पोलिस व अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हा भीषण अपघात होऊनही ट्रक चालक जंगलात पसार झाल्याने डॅनीचा मित्रपरिवार आक्रमक झाला. त्यांनी गोवा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी मागणी केली.

मात्र, ते नसल्याचे सांगताच आक्रमक ग्रामस्थांनी गोव्याहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी वाहतुक तब्बल एक तास रोखली. ज्यांच्या समोरून ट्रक चालक पळून गेला त्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी उपस्थित जमावाने केली. यावेळी पोलिसांनी चालकाला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आश्वासन देताच वाहतूक सुरळीत केली.

याबाबत अधिक माहिती अशी ः डॅनी दुचाकी घेऊन तांबोसे (गोवा) येथून इन्सुलीच्या दिशेने जात होता. तो पत्रादेवी गोवा येथील पोलिस तपासणी नाका आणि अबकारी नाका येथे आला असता. तेथे तपासणीसाठी उभा केलेला ट्रक अचानक बाहेर आला. त्यामुळे डॅनीच्या दुचाकीची ट्रकला धडकला. यात डॅनी ट्रकच्या चाकाखाली सापडलाला. त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला व तो जागीच ठार झाला. अपघातानंतर त्याला गोवा मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले. अपघातानंतर डॅनिच्या मित्रपरिवाराने अपघातस्थळी धाव घेतली. येथे तपासणीच्या नावाखाली गाड्या रोखून ठेवल्या जातात. त्यामुळे अपघात होतात, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला.

सायंकाळी पाचच्या सुमारास डॅनीच्या मित्रपरिवाराने अबकारी नाका येथे जात घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे अबकारी विभागाकडून सांगण्यात आले. पोलिसांनी अपघातानंतर चालक पळून जात असल्याचे फुटेज नातेवाईक व मित्रपरिवार यांना दाखवले. यावेळी उपस्थित आक्रमक झाले. एका तरुणाला चिरडून चालक तुमच्या समोरून पळून जातो आणि तुम्ही त्याला कसे जाऊ देता, असा जाब उपस्थितांनी विचारला.

चालकाला ताब्यात घेत नाही तसेच ज्यांच्या समोरून चालक पळून गेला त्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाही असे सांगत गोव्याहून सिंधुदुर्गमध्ये जाणारी वाहतूक बंद केली. यावेळी मोपा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक रोखण्यात आल्याने तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. उपस्थितांशी मोपा पोलिसांनी चर्चा करून आम्ही चालकाला पकडण्यासाठी बांदा व इतर भागात कर्मचारी पाठवले असून त्याला तात्काळ ताब्यात घेऊ, असे सांगितले.

अजून काही तक्रार असेल तर सांगा; पण रस्ता रोखू नका, असे आवाहन पोलिसांनी केले. यावेळी रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. आम्ही गोवा मुख्यमंत्र्यासमोर हा सारा प्रकार सांगून कारवाईची मागणी करणार, असा उपस्थितांनी सांगितले. डॅनी कुशल मॅकॅनिक होता. मनमिळावू होता. त्याच्या मागे वडील, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com