
एस टी बसमध्ये कासव आढळल्याने तस्करीबाबतचा मोठा संशय व्यक्त केला जात आहे
लांजा - वेंगुर्ले- रत्नागिरी एसटी बसमध्ये चालक व वाहकाला कासव फिरताना आढल्याने कासवाला एस टी कर्मचाऱ्यानी त्याला लांजा येथील वनविभागाच्या ताब्यात दिले. मात्र कासव एस टी बस मध्ये आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वेंगुर्ले-रत्नागिरी एसटी बसच्या कर्मचाऱ्यांना बसमध्ये सापडलेले कासव हे गोड्या पाण्यातील असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र एस टी बसमध्ये कासव आढळल्याने तस्करीबाबतचा मोठा संशय व्यक्त केला जात आहे. वेंगुर्ले ते रत्नागिरी अशी एसटी फेरी सुरू असताना बसवाहक यांना बसमध्ये काळ्या पाठीचे एक कासव फिरताना दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती चालकाला दिली. कासवाला ताब्यात घेऊन एसटी बस रविवारी सकाळी 11 वाजता लांजा बस स्थानकात आली असता लांजाचे वाहतूक नियंत्रक यांना त्याची माहिती दिली. कासव सापडल्याची माहिती एसटी कर्मचारी यांनी लांजा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यावर वनविभागाचे कर्मचारी लांजा बस स्थानकात दाखल झाले. कासवाला ताब्यात घेऊन त्यांनी कासवाला वन अधिवासात सोडून दिले.
हे पण वाचा - शिवसेना खासदारांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपचा मोठा नेता उपस्थित; चर्चेला उधाण
सोनेरी रंगाचे कासव सापडले होते
दोन वर्षांपूर्वी रेल्वे ट्रॅक मार्गावर सुल्काटा जातीचे सोनेरी रंगाचे कासव सापडले होते. रविवारी एस टी बसमध्ये काळ्या रंगाचे व गोड्या पाण्यातील कासव सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. कासवाची तस्करी केली जात नाही ना, असा सवाल प्राणीमित्रांना पडला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे