मुरमाच्या मातीत मेहनत आली फळाला ; चार गुठ्यांत फुलवला झेंडू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

डोंगरावर असलेल्या मुरमाच्या मातीत मेहनत करीत लिंगायत कुटुंबीयांनी डोंगरावर झेंडूच्या फुलांचा मळा पिकविला आहे. 

संगमेश्‍वर (रत्नागिरी) : मेहनत करण्याची तयारी आणि लॉकडाउनच्या दरम्यान मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत लोवले गुरववाडी येथील लिंगायत कुटुंबीयांनी डोंगरावर झेंडूच्या फुलांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. डोंगरावर असलेल्या मुरमाच्या मातीत मेहनत करीत लिंगायत कुटुंबीयांनी डोंगरावर झेंडूच्या फुलांचा मळा पिकविला आहे. 

हेही वाचा - हृदयद्रावक : वर्षभरापूर्वीच मुलीला अन् आता एकुलत्या एक मुलाला गमावलेल्या आई वडिलांचा आक्रोश - 

लोवले गुरववाडीतील अरविंद गुरव उर्फ भाऊ यांना फुलांची लागवड करण्याची इच्छा होती. कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाउनमुळे सर्व कामे ठप्प झाली होती. लॉकडाउनच्या दरम्याने मिळालेला वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आपल्या घराजवळील जागा निवडली. इतर ठिकाणी जागा नसल्याने त्यांनी डोंगरावर फुलांची लागवड केली आहे. चार गुठ्यांमध्ये त्यांनी केसरी व पिवळ्या झेंडूंच्या फुलांची लागवड केली आहे. चार गुठ्यांमध्ये त्यांनी ७०० रोपांची लागवड केली आहे.

लॉकडाउनदरम्यान, अरविंद हे आठवडाभर शेतीमध्ये काम करीत असत. त्यांना त्यांचे वडील सुभाषचंद्र लिंगायत हे सुद्धा मदत करीत आहेत. घरातील फावल्या वेळेत त्यांना घरातील मंडळींचीही मदत लाभत आहे. तसेच त्यांच्या पत्नींचेही त्यांना सहकार्य लाभत आहे. फुलांच्या शेतीसाठी त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. खत वेळेत दिल्यामुळे चांगली फुले आहेत; मात्र माकडांच्या त्रासामुळे त्यांना नेटचा खर्च आला आहे. परंतु डोंगरावरच्या मुरुमाच्या मातीवर त्यांनी झेंडूच्या फुलांचा मळा फुलविला आहे. त्यांच्याकडे कमी दरात झेंडूची फुले मिळत असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

हेही वाचा -  घाबरु नका ; पन्हळे धरणाच्या सांडव्याला गळती मात्र धरणाला धोका नाही

 

संपादन -  स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twiglet flower cultivation in mountain area during lockdown period in 4 ekar area of farming in ratnagiri