रेेल्वेत बँग चोरणार्‍या दोघांना चोवीस तासात अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

चिपळूण - अंजनी (ता. खेड) रेल्वे स्थानकावर एका महिलेची बँग चोरणार्‍या दोघांना रेल्वे पोलिसांनी पकडले. चोरीची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस निरिक्षक अवनीश कुमार यांनी तात्काळ तपास सुरू करून 24 तासात दोघांचा शोध घेतला. संशयितांपैकी एक जण केरळचा तर दुसरा ओडिसा येथील आहेत. त्यांच्याकडून 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चिपळूण - अंजनी (ता. खेड) रेल्वे स्थानकावर एका महिलेची बँग चोरणार्‍या दोघांना रेल्वे पोलिसांनी पकडले. चोरीची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस निरिक्षक अवनीश कुमार यांनी तात्काळ तपास सुरू करून 24 तासात दोघांचा शोध घेतला. संशयितांपैकी एक जण केरळचा तर दुसरा ओडिसा येथील आहेत. त्यांच्याकडून 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार सहा जूनला वालसम्मा सैमुअल (रा. केरळ) ही महिला पुणे - एर्नाकुलम या रेल्वेने प्रवास करीत होती. रात्री रेल्वे अंजनी (ता. खेड) येथील स्थानकावर क्रॉसींगसाठी थांबवण्यात आली. अंधाराचा फायदा घेत दोघानी सैमुअल यांची बॅग चोरली आणि तेथून पसार झाले. बॅग चोरीला गेल्याचे समजल्यानंतर त्या महिलेने आरडा ओरड सुरू केली.

रेल्वे कर्मचार्‍यांना माहिती दिली. रेल्वे कर्मचार्‍यांनी चिपळूण येथील रेल्वेचे पोलिस निरिक्षक अवनीश कुमार यांना या चोरीची माहिती दिली. अवनीश कुमार सहकारी कर्मचार्‍यांना घेवून अंजनीला गेले. तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रेल्वे स्थानकावरील संशयितांची तपासणी केली. रेल्वेच्या परिसरातही शोध घेतला. मात्र अंधाराचा फायदा घेत संशयित रेल्वे स्थानकावरून पळण्यात यशस्वी झाले होते.

सकाळी रेल्वे पोलिसांकडून पुन्हा तपास सुरू झाला. अवनीश कुमार यांनी गुप्त माहितीच्या आधारे निखील कुमार नारायण कुमार (वय - 25, रा. कलस अप्पा रामबाग हाउस जि. केलाकम, राज्य केरळ) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने चोरीची कबुली दिली.

त्याच्याकडून एक मोबाइल, दहा हजार रुपये रोख, आधार कार्ड व अन्य कागदपत्रांसह  20 हजाराचा मुद्देमाल मिळाला. त्यानंतर निखील कुमारच्या साथीदाराचा शोध सुरू झाला. रेल्वे पोलिसांनी निखील कुमारकडून त्याच्या साथीदाराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतू त्याने संपूर्ण माहिती दिली नाही.

पोलिस निरिक्षक अवनीश कुमार यांनी अंजनी गावात त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला. तेथे काही संशयास्पद व्यक्तीची तपासणी करण्यात आली. ग्रामस्थांकडून माहिती घेण्यात आली. या दरम्यान प्रल्हाद मुरली महाराणा (वय 35, राहणार डेरा साही, भागपतघर, नायगढ़, राज्य ओडिसा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यानेही चोरीची कबुली दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested in robbery case by Railway police