विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये अपघात

दारूम येथील घटना; चार प्रवासी जखमी
विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये अपघात
विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये अपघातsakal
Updated on: 

कणकवली : विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये आज दुपारी तीनच्या सुमारास दोन कार समोरासमोर धडकल्‍या. यात कारमधील चौघे प्रवासी जखमी झाले. दारूम गावच्या हद्दीत ही घटना घडली. येथील वळणाचा अंदाज न आल्‍याने हा अपघात झाल्‍याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये अपघात
100 कोटी डोस : थरुरांकडून सरकारचं कौतुक, काँग्रेसनं सुनावलं

मारुती ओमनी व्हॅन (MH-01–AH– 9346) ही कासार्डे ते विजयदुर्ग अशी प्रवास करत होती. तर विजयदुर्गहून अल्टो के टेन (MH-07-AB–4560) ही गाडी कासार्डेच्या दिशेने येत होती. दारूम येथे वळणाचा अंदाज न आल्‍याने या दोन्ही कार समोरासमोरासमोर धडकल्‍या.

या अपघातात ओमनी व्हॅन मधील चार प्रवासी जखमी झाले. निर्मला दीपक समजीसकर, दीपक यशवंत समजीसकर, माधुरी दयानंद मेस्त्री, प्रथमेश दयानंद मेस्त्री अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर अपघातस्थळी एपीआय शेखर शिंदे, हवालदार वंजारे यांनी धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com