ब्रेकिंग - लांज्यात कोरोनाची एन्ट्री, दोन जणांना लागण 

two corona positive patient in lanja
two corona positive patient in lanja
Updated on

लांजा : मुंबईहून लांज्यात आलेली दोन  मुले कोरोनाबाधीत असल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. गेले ४० दिवस सुरक्षित असलेल्या लांजा तालुक्यात दोन रूग्ण सापडले असून, त्यामुळे तत्काळ कन्टन्मेंट एरिया व बफर झोन करण्याची कारवाई तालुका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

लांजा तालुक्यातील आरगाव येथील पाच जणांचे कुटुंब मुंबईहून ८ मे रोजी चालत गावाकडे आले होते. या कुटुंबात 8 व 9 या दोन मुलांचा समावेश आहे. ८ मे रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.  स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना लांज्यात क्वारंटाईन करण्यात आले होते. पहिला अहवाल निगेटिव आल्याने त्यांना आज सकाळी घरी पाठवण्यात आले होते. मात्र सोमवारी सायंकाळी त्याचा अहवाल आला असून, यामध्ये दोन मुलांचा अहवाल पॉझिटिव आला आहे तर उर्वरित कुटुंबातील सदस्य व आईसह तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

आरगाव गावाच्या सीमा बंद करण्यासह तेथे आरोग्य तपासणी करण्यासारख्या प्रक्रिया सोमवारी संध्याकाळपासूनपासून सुरू केल्या जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. परंतु, या जिल्ह्यात मुंबई - पुणे या रेड झोनमधील व्यक्तींचा शिरकाव होतच राहिला तर पुढील काळात धोका वाढण्याची भीती आहे.

दरम्यान, गेले चाळीस दिवस लांजा तालुका सेफ समजला जात होता. मात्र मुंबईकरांनामुळे आता कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri Police cleanliness drive at Gopalgad Fort
pali shri ballaleshwar ganpati darshan
Shiv Shinde
Kolhapur student drowned at Ratnagiri beach
Marathi News Esakal
www.esakal.com