esakal | सावधान ! राजापुरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Two Corona Positive Patient In Rajapur Ratnagiri Marathi News

तालुक्‍यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी नव्वदी गाठलेली असताना गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. तालुक्‍यामध्ये आज 574 चाकरमानी नव्याने दाखल झाले आहेत.

सावधान ! राजापुरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तालुक्‍यामध्ये आज शीळ आणि विखारेगोठणे येथे प्रत्येकी एक असे दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 92 झाली आहे. दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. शीळ आणि विखारेगोठणे येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला आहे. गेल्या चार महिन्यांपासून शीळ गाव सुरक्षित होते; मात्र आज सापडलेल्या रुग्णाने शीळ गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या दोन्ही रुग्णांची राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये अँटिजेन टेस्ट घेतली होती. त्यामध्ये त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना दिवसागणिक वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे तालुक्‍यात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. 

दृष्टिक्षेपात राजापूर 
एकूण कोरोना पॉझिटिव्ह ः 92 
बरे झालेले रुग्ण ः 66 
एकूण मृत्यू ः 7 
ऍक्‍टिव्ह रुग्ण ः 19 

तालुक्‍यात 8676 होम क्वारंटाईन 
तालुक्‍यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी नव्वदी गाठलेली असताना गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. तालुक्‍यामध्ये आज 574 चाकरमानी नव्याने दाखल झाले आहेत. सद्यःस्थितीमध्ये तालुक्‍यात 8 हजार 676 नागरिकांना होम क्वारंटाईन केले आहे. 
 

loading image