‘मुंबई-पुणे’वर अपघातात दोघे ठारIAccident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

‘मुंबई-पुणे’वर अपघातात दोघे ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खोपोली ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुण्याहून कॉईल घेऊन निघालेला ट्रेलर बोरघाट उतारावर जात असताना अचानक लोखंडी कॉईल निसटली. यामध्ये ट्रेलरचा पुढचा भाग मोडून पडला व निसटलेली कॉईल मागे असणाऱ्या कंटेनरवर आदळल्याने कंटेनर पलटी होऊन रस्त्यावर आडवा झाला. यातील डाळिंबाचे दाणे असलेल्या गोणी रस्त्यावर पसरल्या. अपघातात दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले.

अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी (ता. १४) रात्री ८ वाजता हा अपघात घडला. अपघातात ट्रेलरमधील चालक सुरेशकुमार लक्ष्मणराव गडलिंग (रा. अमरावती), राजकुमार सुधाकरराव (दिल्ली) हे दोन जण ठार झाले. तसेच कंटेनरमधील पप्पू गुप्ता, राजकुमार सिंग (दोघे रा. उत्तर प्रदेश) जखमी झाले. अपघाताची माहिती होताच खोपोली अपघातग्रस्त टीम, आयआरबी डेल्टा फोर्ससह वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ट्रेलरमध्ये अडकलेल्या दोन मृत व्यक्तींना बाहेर काढले.

जखमींना उपचारासाठी दाखल केले. कंटेनर व पडलेल्या गोणी बाजूला करून दोन तासांनंतर मुंबईकडे जाणारा मार्ग मोकळा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

loading image
go to top