esakal | लाकूड परवाना देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना दोघेजण जाळ्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

two people died taking bribe in dapoli

लाच घेताना दापोलीच्या वनविभाग कार्यालयातील एकाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी रंगेहात पकडले

लाकूड परवाना देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना दोघेजण जाळ्यात 

sakal_logo
By
चंद्रकांत जोशी

दाभोळ : लाकूड वाहतूक परवाना देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना दापोलीच्या वनविभाग कार्यालयातील एकाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी रंगेहात पकडले असून याप्रकरणी दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा लाकूड विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी दापोली येथील एका शेतकऱ्याकडून तोडलेली झाडे जळाऊ लाकूड व इमारती
 लाकूड विकत घेतली. ही झाडे तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, तोडलेल्या झाडांच्या लाकडांच्या वाहतुकीच्या पासाची गणी तक्रारदार यांनी वन अधिकारी दापोली यांच्या कार्यालयात केली होती. ही परवानगी देण्यासाठी दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर आणि सचिन आंबेडे यांनी 20 ऑगस्ट रोजी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येक वाहतुकीच्या पासासाठी 1 हजार 300 रूपये प्रमाणे 5 पासांचे 
6 हजार 500 रूपये रक्कमेची लाचेची मागणी केली. पंरतू या लाकूड वाहतुकीच्या  पासकसाठी शासकिय शंभर रूपये असताना या दोन संशयितांनी तक्रारदार यांच्याकडे 5 वाहतुकीच्या पासासाटी 6 हजार 500 रूपये इतक्या
 रक्कमेच्या लाचेची मागणी करत असल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक  विभाग रत्नागिरी यांच्याकडे दिली होती. 
या तक्रारीनुसार आज करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदार यांच्याकडे लाकूड वाहतुकीच्या पासासाठी 6 हजार 500 रूपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती  वाहतुकीच्या पासांचे 5 हजार रूपये घेताना सचिन आंबेडे यांनी घेतल्याचे मान्य केले. 

हे पण वाचा -  ब्रेकिंग - रत्नागिरीत आज कोरोना रूग्णांची विक्रमी वाढ

पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्यानुसार आज  सापळा लावण्यात आला असता, वनपाल गणेश खेडेकर याच्या सांगण्यानुसार आंबेडे याने तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 
या प्रकरणी दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

हे पण वाचाकार्डधारकांना या महिन्यात धान्य वेळेवर मिळणार नाही ; काय आहे कारण ?  

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण कदम,  पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस नाईक बिशाल नलावडे, पोलीस नाईक  योगेश हुंबरे यांनी केली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image