काशीदजवळ समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 June 2019

अभिषेक म्हात्रे (वय 32) आणि पूजा शेट्टी (वय 28) अशी त्यांची नावे आहेत. पनवेलनजीकच्या नावडा येथील रहिवासी असलेले म्हात्रे पत्नी तसेच पूजासह काशीद येथे मित्राच्या फार्महाउसमध्ये उतरले होते.

मुरूड : तालुक्‍यातील काशीद समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

अभिषेक म्हात्रे (वय 32) आणि पूजा शेट्टी (वय 28) अशी त्यांची नावे आहेत. पनवेलनजीकच्या नावडा येथील रहिवासी असलेले म्हात्रे पत्नी तसेच पूजासह काशीद येथे मित्राच्या फार्महाउसमध्ये उतरले होते.

रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास म्हात्रे आणि पूजा समुद्रात गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. म्हात्रे यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या दोघांचा शोध घेण्यास सुरवात केली. तासाभरानंतर दोघांचेही मृतदेह सापडले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two youths drowned on Kashid beach