Uday Samant I सामंत म्हणाले; मी जोडणारा आहे, तोडणारा नाही त्यामुळं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेतल पाहिजे.

सामंत म्हणाले; मी जोडणारा आहे, तोडणारा नाही त्यामुळं...

रत्नागिरी : पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेतल पाहिजे. आपल्यापासून दूर गेलेल्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. राज्यात राजकीय कल्लोळ सुरु असताना आज मंत्री सामंत हे पाली येथील निवासस्थानी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली.

सामंत म्हणाले, मी पण गुवाहाटीला गेलो आशा बातम्या आल्या. पण मी आता रत्नागिरीतल्या पाली येथील माझ्या घरी आलो आहे. मी शिवसेनेतच आहे असंही मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या प्रतोदानी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदानी काढलेली नोटीस त्यामध्ये टेक्निकली बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरणार आहे. पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ असून या लढाईला सामोरं गेलं पाहिजे, असं सामंत यावेळी म्हणाले.

हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: अजित पवार तातडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

आमदार शिरसाट यांच्या यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यावर माझं मत व्यक्त करणं मला उचित वाटत नाही. मी जोडणारा आहे तोडणारा नाही. मला हे सर्व जोडावं असं वाटतं. एकनाथ शिंदे यांची सुरवातीपासूनच नेमकी भूमिका काय आहे हे काय पक्षाला कळले नाही. ती भूमिका मांडणं आवश्यक होतं. माझी भूमिका मी बैठकीमध्ये मांडली आहे.

पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर करणं गरजेचं आहे. या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. शिवसेना पक्ष डॅमेज होणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली गेली पाहिजे, असं मत यावेळी सामंतांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंचे सेक्रेटरी सचिन जोशी चर्चेत का आले?

Web Title: Uday Samant On Eknath Shinde Topic Solve Problems Necessary To Discuss Who Have Gone Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top