esakal | उदय सामंत यांनी घेतला चिपी विमानतळाचा आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

उदय सामंत यांनी घेतला चिपी विमानतळाचा आढावा

उदय सामंत यांनी घेतला चिपी विमानतळाचा आढावा

sakal_logo
By
अजय सावंत

कुडाळ: चिपी विमानतळ श्रेयवादाबाबत कोण काय म्हणतो याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न असलेले चिपी विमानतळ 9 ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सत्यात उतरत आहे. याचा आम्हाला आनंद होत आहे. यासाठी आज आढावा बैठक घेतली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा: हर्णे : समुद्रकिनारी दर्ग्यासमोरच डॉल्फिन मासा मृतावस्थेत

गेले कित्येक महिने चिपी विमानतळचा उद्घाटन हा प्रश्न प्रलंबित होता. सर्व त्रुटी, तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाचे उद्घाटन येत्या 9 ऑक्टोबरला मुख्यमंत्री ठाकरे, केंद्रीय हवाई मंत्री ज्योतीरादित्य शिंदे तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक डॉ.राजेंद्र दाभाडे यांनी चिपी विमानतळला भेट दिली. या ठिकाणी पाहणी केल्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, "9 ऑक्‍टोबरला सिंधुदुर्ग चिपी विमानतळचे स्वप्न उद्घाटनच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. हे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. वीज, पाणी, मोबाईल कनेक्टि जे काही प्रश्न होते, त्याचा आढावा घेण्यात आला आहे. पाट परुळे रस्त्याबाबत माहिती घेण्यात आली आहे. तांत्रिक सर्व प्रश्न मार्गी लागल्यामुळे 9 ऑक्‍टोबरला या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. श्रेयवादाबाबत कोण काय म्हणत आहेत, या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो.

वादाचा प्रश्न या ठिकाणी नाही. खासदार राऊत यांनी विमानतळाबाबत सातत्याने पाठपुरावा केला, त्याचे हे यश म्हणावे लागेल. आयआरबीची चर्चा झाली असून पूर्ण विमानसेवा सुरू करण्यासाठी आयआरबी सज्ज झाला आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून सर्व त्रुटी पूर्ण झाल्या असून विमान सेवा सुरू होण्यासाठी कोणतेही अडथळे नाहीत."

खासदार राऊत यांनी म्हणाले, "आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, या नात्याने काम करत आहोत. त्यामुळे याचे श्रेय आम्हाला घ्यायचे नाही. जनतेचे समाधान हे आमचे श्रेय आहे. जनतेचे आर्शिवाद आम्हाला मिळत असेल तर ती गणरायाची कृपा आहे. कोकणवासियांना चिपी विमानतळावरून २५०० रुपयात मुंबईतून कोकणात आणि कोकणातून मुंबईत असा विमान प्रवास शक्य होईल."

loading image
go to top