

उद्योगमंत्री तथा शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
esakal
Konkan Politics : महायुती झाली पाहिजे, या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेशी सहमत आहे. युती होणार असेल तर मी मिठाचा खडा पडू देणार नाही. युती झाली नाही तर शिंदे शिवसेना म्हणून आम्ही स्वतंत्र लढून जिल्ह्यात भगवा फडकवू, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री तथा शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात आगामी नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीबाबत खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत युती झाली पाहिजे, असे सूतोवाच केले. त्याबाबत सामंत यांनी येथे पत्रकार परिषद घेतली.