सावंतवाडीत भाजपतर्फे विक्रेत्यांना छत्र्या

सावंतवाडीत भाजपतर्फे विक्रेत्यांना छत्र्या

88126

सावंतवाडीत भाजपतर्फे विक्रेत्यांना छत्र्या
विशाल परबांचा पुढाकारः नारायण राणेंच्या विजयानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांच्या विजयाचा आनंदोत्सव म्हणून युवा उद्योजक तथा भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सावंतवाडी शहरासह तालुक्यातील तब्बल २०० व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले. श्री. परब यांनी केलेल्या या छत्र्या वाटपाबद्दल व्यापारी बांधवांनी आभार व्यक्त केले.
उन्हाळा असो किंवा पावसाळा, या ऋतूंमध्ये व्यापारी भाजीपाला तसेच इतर सुविधा आपल्याला उपलब्ध करून देत असतात. त्यांच्या संरक्षणासाठी एक मायेचे छत्र हवे, यासाठी नारायण राणे यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत श्री. परब यांनी या छत्र्या वाटप केल्या. या छत्र्यांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांचा उल्लेख आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तीन तालुक्यांतील भाजीपाला विक्रेत्या, व्यापारी तसेच रस्त्यावर हात विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना तब्बल पाच हजार छत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे, असे परब यांनी सागितले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. छत्री वाटप कार्यक्रमास माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आरवडेकर, उत्कर्षा आसोलकर, भाजप सरचिटणीस विनोद सावंत, केतन आजगावकर, अमित गवंडळकर, अमित परब, गणेश कुडव, सागर मठकर, शक्तिकेंद्रप्रमुख बंटी जामदार, मंदार पिळवणकर, अजय सावंत आदी उपस्थित होते.

चौकट
वटपौर्णिमेपर्यंत बसण्याची व्यापाऱ्यांना मुभा द्या
आठवडा बाजारामध्ये रस्त्यावर बसणाऱ्या महिला विक्रेत्यांना हटवण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. यासंदर्भातील सूचना पालिकेकडून आज व्यापाऱ्यांना देण्यात आल्या. छत्री वाटपादरम्यान त्या ठिकाणी गेलेल्या विशाल परब यांच्या कानावर ही बाब व्यापाऱ्यांनी घातली. आम्हाला वटपौर्णिमेपर्यंत बसण्यास मुभा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. व्यापाऱ्यांची ही मागणी लक्षात घेत श्री. परब यांनी तत्काळ मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत वटपौर्णिमेपर्यंत व्यापाऱ्यांना बसण्यास मुभा द्यावी, असे सांगितले. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्याधिकारी साळुंखे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com