Pali Crime : मामाने केला भाचीच्या विनयभंगाचा प्रयत्न; मामावर गुन्हा दाखल

मामाने भाचीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच सुधागड तालुक्यातील विडसई गावात घडली.
crime
crimesakal
Updated on

पाली - मामाने भाचीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच सुधागड तालुक्यातील विडसई गावात घडली आहे. सदर व्यक्ती महिलेच्या काकीचा भाऊ आहे. या संदर्भात पाली पोलीस स्थानकात शुक्रवारी (ता. 28) नवीन फौजदारी कायद्यातील (भारतीय न्याय संहिता, 2023) कलम 74 नुसार, संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेने पाली पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित पीडित महिला (वय-33) तिच्या माहेरी विडसई येथे राहण्यास आलेली आहे. 19 फेब्रुवारी रोजी पीडित महिलेची आई ही सकाळी 08.30 वाजताच्या सुमारास नाशिक येथे कामानिमित्त गेली होती. त्यावेळी पीडित महिला घरी एकटीच होती.

सकाळी 10.00 वाजताच्या सुमारास घरातील कामे करित असताना तिचा मामा (काकीचा भाऊ) तिच्या घरी आला व पाणी मागितले आणि महिलेच्या घरातील हॉलमध्ये येवुन बसला. महिलेने त्यांना पाणी आणून दिले. त्यानंतर ही महिला बेडरूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असताना मामा बेडरूममध्ये आला व महिलेला मागून पकडून तिच्या चेहऱ्यावर पप्पी घेतली. महिलेने त्यांना ढकलले व बेडरूमच्या बाहेर येत असताना मामाने महिलेचा गाउन पकडला.

महिलेने त्याला पुन्हा ढकलून ती बाहेर हॉलमध्ये आली. त्यानंतर सुध्दा मामा महिलेच्या मागे हॉलमध्ये आला व परत गाउन पकडून त्या महिलेला आत खेचू लागला, या झटापटीत महिलेचा गाउन फाटला. यावेळी मामा म्हणाला की, मी तुला मोठा मोबाईल घेवून देतो. तेव्हा महिला त्यांना म्हणाले की, मी तुमचे नाव मामीला सांगेन, त्यावेळी ते म्हणाले की, तु मामीला माझे नाव सांगितलेस तर मला हार्ट ऍटॅक येईल.

तु मला तुझा मोबाईल नंबर दे तेव्हा महिलेने मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने मामा घरातून निघून गेला. त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी महिलेची आई ही नाशिकवरून घरी आल्यानंतर तीला महिलेने झालेला सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी महिलेचे नातेवाईक मामाच्या घरी मौजे ताकई, ता. खालापुर गेले व या ठीकाणी एकत्र बसून झालेल्या प्रकाराबाबत चर्चा केली. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी पाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com